जोड : ग्लोबल हॉस्पिटल येथे सीटी स्कॅन सुविधा सुरू करण्याचे पालकमंत्री शिंदे यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:49+5:302021-04-01T04:41:49+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी सर्व विभागांमध्ये दैनंदिन साफसफाई योग्यप्रकारे करणे, आवश्यकतेनुसार औषध फवारणी करणे तसेच जे नागरिक मास्क वापरत नाही त्यांच्यावर ...
कोरोनाला रोखण्यासाठी सर्व विभागांमध्ये दैनंदिन साफसफाई योग्यप्रकारे करणे, आवश्यकतेनुसार औषध फवारणी करणे तसेच जे नागरिक मास्क वापरत नाही त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे, वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेणे, रात्री ८ वाजल्यानंतर लागू असलेल्या जमावबंदीचे पालन होत आहे की नाही यासाठी गस्त वाढविणे, तसेच आवश्यकतेनुसार मार्शलची नियुक्ती करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना केल्या.
* सीटीस्कॅनची मशीन उपलब्ध करा :
कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी दाखल करता यावे यासाठी रुग्ण्वाहिकांची संख्या वाढविणे, आवश्यकतेनुसार परिवहनच्या बसेसचे रुग्णवाहिकेत परिवर्तित करणे, तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यासाठी ग्लोबल कोविड सेंटर, पार्किंग प्लाझा येथे सीटी स्कॅनची मशीन उपलब्ध करणे, जेणेकरून रुग्णांना इतरत्र जावे लागणार नाही व रुग्णांवर योग्य उपचार करणे सोईचे होईल या दृष्टीने कार्यवाही करावी, आदी सूचना देत असतानाच या सूचनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.