ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कारभार पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे; एक महिना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:34 PM2018-04-10T19:34:37+5:302018-04-10T19:34:37+5:30
ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर मसुरी येथे सुरु होणा-या सेवाविषयक प्रशिक्षणासाठी गेले आहे. सुमारे महिना भर असलेल्या या प्रशिक्षण कालावधीत ठाणे जिल्ह्याचा कारभार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे अतिरिक्तरित्या कार्यभार सोपविण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्याच्या कामकाजाचे सूत्र हाती घेताच शनिवारी डॉ. नारनवरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिका-यांच्या सतत आढावा बैठकां घेण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील इतंभूत कामकाजाचा आढावा घेवून अधिकायांना नवनवीन कामकाजाच्या पध्दती त्यांच्याकडून सांगितल्या जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम युद्धपातळीवर राबवावी, मतदार यादी शुद्धीकरणाला देखील वेग द्यावा असे निर्देश त्यांनी संबंधीताना या आढावा बैठकीत दिले आहेत. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची बदली झाली असता त्यांच्या जागी आलेले नवनिर्वाचित निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील या आढावा बैठकीस, निवडणूक उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, आदींसह विविध खाते प्रमुख अधिकारी या आढावा बैठकीत उपस्थित होते.