ठाण्यात कोरोना रुग्णांची चेन तोडण्यात प्रशासन असफल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 02:54 AM2020-06-10T02:54:55+5:302020-06-10T02:55:04+5:30
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असून ही धोक्याची घंटा आहे. बाधीतांची संख्या कमी करून ही चेन तोडण्यात प्रशासन अपुरे पडत असल्याची टीका ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे हायरिस्कमधील आणि कोरोना बाधीत रुग्णांना तत्काळ उपचार देऊन ही चेन कशी तोडता येईल, यासाठी प्रयत्न करा अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
शहरात बाधीतांनी चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. उपाययोजना करूनही त्यांची रुग्णांची संख्या कमी होत नसून ही अतिशय चितेंची बाब आहे. त्यामुळे कोरोना ओटाक्यात आणण्यासाठी आणखी काय काय करता येऊ शकते. यासाठी सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी बाधीत रुग्णांची संख्या कमी होत नसून ही ठाण्यासाठी चिंतेची बाब असल्याचे सांगितले. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यानंतर तेथील भागाचा सर्व्हे तत्काळ गरजेचे आहे. परंतु, तसेही होतांना दिसत नाही. ही गंभीर बाब आहे. एकूणच बाधीतांची चेन तोडण्यात प्रशासन असफल ठल्याचा ठपकाह त्यांनी ठेवला.