धोकादायक इमारतींच्या नोटिसांवरून प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:51+5:302021-06-19T04:26:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत धोकादायक इमारती व त्यांना देण्यात येत असलेल्या नोटिसांबाबत भाजप ...

The administration was caught red-handed by notices of dangerous buildings | धोकादायक इमारतींच्या नोटिसांवरून प्रशासनाला धरले धारेवर

धोकादायक इमारतींच्या नोटिसांवरून प्रशासनाला धरले धारेवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत धोकादायक इमारती व त्यांना देण्यात येत असलेल्या नोटिसांबाबत भाजप नगरसेवकांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्ट्रक्टरल ऑडिटविना इमारतींना नोटिसा कशा दिल्या? असा प्रश्न भाजपचे नगरसेवक राजेश वधारीया यांनी विचारले.

उल्हासनगरात गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जणांचा बळी गेला. तर अनेकजण जखमी झाले. अशा घटना टाळण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दहा वर्षे जुन्या असलेल्या १३०० इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटिसा दिल्या. तसेच १९९२ ते ९८ दरम्यानच्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभागानुसार समित्या नेमून ५०५ इमारतींची यादी जाहीर करून स्ट्रक्चरल ऑडिट मागितले, तर काही अतिधोकादायक इमारतीचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला.

महासभा सुरू झाल्यावर माजी आमदार ज्योती कलानी यांच्यासह दिवंगत माजी नगरसेवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महापौर लीलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव यांनी महासभा सुरू केली. यावेळी शहरातील धोकादायक इमारती व त्यांना देण्यात आलेल्या नोटिसांबाबत बहुतांश नगरसेवकांनी आयुक्तांना जाब विचारला. एकाचवेळी अनेक नगरसेवक बोलत असल्याने, नेमके कोण काय बोलते. हे ऐकू येत नसल्याने, महासभेत गोंधळ उडाला होता. शहरातील विकासकामे, नालेसफाई, महापालिकेचे उत्पन्न, कोरोनाबाबत उपाययोजना आदींबाबत यावेळी चर्चा झाली. विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, राजेश वधारिया, राजू जग्यासी यांच्यासह अन्य भाजप नगरसेवक महासभेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन घोषणाबाजी केली. शहरात भाजपविरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता.

Web Title: The administration was caught red-handed by notices of dangerous buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.