प्रशासकीय इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 12:22 AM2020-02-29T00:22:34+5:302020-02-29T07:02:49+5:30

विविध सरकारी कार्यालये येणार एकाच छताखाली, नागरिकांची सोय होणार

administrative buildings not opened due to not getting cm uddhav thackerays date for inauguration | प्रशासकीय इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेना

प्रशासकीय इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेना

Next

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : विविध सरकारी कार्यालयांसाठी बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन रखडल्याचे बोलले जात असून तहसील कार्यालयाच्या हस्तांतराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

उल्हासनगरमधील नागरिकांच्या सुविधांसाठी विविध सरकारी कार्यालये एकाच प्रशासकीय इमारतीमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला आहे. कॅम्प नं-३ येथील पवई चौक व कॅम्प नं-५ मध्ये तहसील कार्यालयाच्या खुल्या जागेत प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या आहेत. कॅम्प नं-५ येथील इमारतीचे काम पूर्ण झाले असून उद्घाटनाला अडसर नको म्हणून इमारती बाहेरील रस्त्याजवळील ६५ टपऱ्यांवर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी कारवाई केली. पवई चौकातील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले असून अंतर्गत रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. दोन्ही प्रशासकीय इमारतींसाठी १० कोटी खर्च आला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन लांबल्याची चर्चा रंगली आहे.

पवई चौकात तळ अधिक एक मजला इमारत बांधण्यात आली असून तळमजल्यावर तहसील कार्यालय, तलाठी व सर्कल कार्यालय, सेतू व सहायक पोलीस आयुक्त कार्यालय असणार आहे. तर पहिल्या मजल्यावर उपविभागीय, उपकोषागार, प्रशासन, निवडणूक तसेच तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय असेल. तर कॅम्प नं-५ येथील तहसील कार्यालयाच्या खुल्या जागेवर उभ्या राहिलेल्या तळ अधिक तीन मजल्याच्या इमारतीत तळमजल्यावर वाहनतळ, असेल.

पहिल्या मजल्यावर राज्य उत्पादन शुल्क, शिधावाटप, दुसऱ्या मजल्यावर सहायक दुयम निंबधक, नागरी संरक्षण, होमगार्ड व दुय्यम निबंधक कार्यालय असणार आहे. तर तिसºया मजल्यावर वजनमापे कार्यालय असणार आहे.

तहसील कार्यालायवरून सुरू आहे खेचाखेची
तहसील कार्यालय जुन्याच ठिकाणी बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीत राहावे यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर आग्रही असून त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र पवई चौक येथे बांधलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यालय दाखविण्यात आले असून त्याप्रमाणे सुविधा व बांधकाम केले आहे.

Web Title: administrative buildings not opened due to not getting cm uddhav thackerays date for inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.