अ‍ॅडमिशनच्या नावावर उकळले २१ लाख

By admin | Published: January 15, 2017 05:16 AM2017-01-15T05:16:00+5:302017-01-15T05:16:00+5:30

नवी मुंबई, कामोठे येथील महाविद्यालयात एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ठाण्यातील तिघांना सुमारे २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

Admision's name boils down to 21 million | अ‍ॅडमिशनच्या नावावर उकळले २१ लाख

अ‍ॅडमिशनच्या नावावर उकळले २१ लाख

Next

ठाणे : नवी मुंबई, कामोठे येथील महाविद्यालयात एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ठाण्यातील तिघांना सुमारे २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गंडा घालणारा भामटा सध्या पोक्सो गुन्ह्याखाली न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपवन येथील पोळीभाजी केंद्र चालवणारे राज मिलिंद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत, पाचपाखाडी, पाटीलवाडीतील सुयोग भोईर याने त्यांना व त्यांचा भाचा विजय शिरसाठ आणि त्यांच्या ओळखीच्या प्रकाश चोळेकर यांचा मुलगा धीरज यास कामोठे, नवी मुंबई येथील एमजीएम कॉलेजमध्ये एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगितले. त्यानुसार, भोईर याने आपल्याच घरी त्यांच्याकडून दोन टप्प्यांत २० लाख ५० हजार रुपये घेतले. हा प्रकार आॅगस्ट २०१५ ते आॅक्टोबर २०१६ दरम्यान घडला. पैसे देऊनही अ‍ॅडमिशन मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शुक्रवारी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

मध्यवर्ती कारागृहाकडे करणार पत्रव्यवहार
गंडा घालणाऱ्या सुयोग यांच्याविरोधात २०१६ मध्ये पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याला अटक केली आहे. त्यामुळे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्याविरोधात नौपाडा पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
तसेच फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याचा ताबा मिळावा, यासाठी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

Web Title: Admision's name boils down to 21 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.