डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. गणेश धारगळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:19+5:302021-09-16T04:50:19+5:30

ठाणे : डोंबिवली नागरी सहकारी (डीएनएस) बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या ...

Adv. Ganesh Dhargalkar | डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. गणेश धारगळकर

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. गणेश धारगळकर

googlenewsNext

ठाणे : डोंबिवली नागरी सहकारी (डीएनएस) बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी १३ जणांचे नवनिर्वाचित संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी व उपनिबंधक (महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, पुणे) दिलीप उढाण यांनी ५ सप्टेंबर रोजी झालेल्या बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. यावेळी ॲड. गणेश धारगळकर यांची अध्यक्षपदी तर नंदिनी कुलकर्णी यांची उपाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित संचालक मंडळात सी. ए. जयंत पित्रे, महेश फणसे, मिलिंद आरोलकर, योगेश वाळुंजकर, जितेंद्र पटेल, लक्ष्मण खरपडे, योगेश चौधरी, सी.ए. विजय शेलार, सी.ए. अभिजित मराठे, पूर्वा पेंढरकर व ॲड. मेघना आंबेकर हे सदस्य संचालक म्हणून निवडून आले आहेत. या संचालक मंडळात तीन चार्टर्ड अकाउंटंट, दोन ॲडव्होकेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन तज्ज्ञ, बँकिंगचा प्रदीर्घ अनुभव असलेले तसेच वास्तुरचनाकार माध्यम सल्लागार व निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अशा विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा समावेश आहे.

-------------

Web Title: Adv. Ganesh Dhargalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.