केडीएमसी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार; सानुग्रह अनुदानाची घोषणा हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:29 PM2019-10-27T23:29:45+5:302019-10-27T23:29:56+5:30

केडीएमटीत तोही दिलासा नाही

Advance salary to KDMC employees; The announcement of a generous grant is up in the air | केडीएमसी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार; सानुग्रह अनुदानाची घोषणा हवेतच

केडीएमसी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार; सानुग्रह अनुदानाची घोषणा हवेतच

Next

कल्याण : दिवाळीच्या तोंडावर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने केडीएमसीने यंदा लवकर सानुग्रह अनुदानाची (बोनस) घोषणा केली होती. मात्र, त्याची दिवाळी सुरू झाली तरी अंमलबजावणी न झाल्यामुळे ती घोषणा हवेतच राहिली आहे. केडीएमसी कर्मचाऱ्यांना आॅक्टोबरचा पगार आगाऊ मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, केडीएमटीच्या कर्मचाºयांची तीही सोय न झाल्याने त्यांच्या दिवाळीच्या आनंदावरच विरजण पडले आहे.

आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता लागण्याआधीच दिवाळीचे सानुग्रह अनुदान महापालिकेच्या कर्मचाºयांना लवकर मिळावे अशी मागणी केडीएमसीतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या मान्यताप्राप्त युनियनने केली होती. त्यानुसार १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर विनीता राणे यांनी सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यातील महासभेत केली होती. त्यामुळे दिवाळीपूर्वीच हे अनुदान हातात पडेल, या आशेवर कर्मचारी होते. महापालिकेची बेताची आर्थिक परिस्थिती पाहता हे अनुदान दोन टप्प्यांत मिळणार होते. पण दिवाळी सुरू झाली तरी त्यांच्या हातात ते पडलेले नाही.

दरम्यान, या कर्मचाºयांना आॅक्टोबरचा पगार आगाऊ देण्यात आला आहे. त्या पगारावरच दिवाळी साजरी करण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. केडीएमटी कर्मचाºयांना तर सानुग्रह अनुदान मिळाले नाहीच, शिवाय आगाऊ पगारही देण्यात आलेला नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत खर्च कसा भागवायचा, याच्या कात्रीत ते सापडले आहेत. त्यांच्यात केडीएमसीकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचीही भावना आहे. केडीएमटी कर्मचाºयांना महिन्याचा पगारही नेहमीच उशिराने होतो. सप्टेंबरचा पगारही आॅक्टोबरच्या २४ तारखेला मिळाला आहे. उधारी, बँकांचे हप्ते तसेच इतर दैनंदिन वस्तूंच्या वापरावर हा पगार खर्च झाल्याने दिवाळी साजरी करायची कशी? असा यक्षप्रश्न संबंधित कर्मचाºयांना पडला आहे.

शुक्रवारी सानुग्रह अनुदान वितरित करण्याच्या पत्रावर आयुक्त गोविंद बोडके यांची स्वाक्षरी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पण दिवाळीनिमित्त सोमवारपर्यंत बँका बंद असल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत कर्मचाºयांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सानुग्रह अनुदानाची घोषणा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी झाली होती. त्याची अंमलबजावणी तत्परतेने होणे आवश्यक होते. आॅक्टोबरचा पगार आगाऊ दिला आहे ही समाधानाची बाब आहे. पण, त्याच्या जोडीला जाहीर केलेले सानुग्रह अनुदान मिळाले असते तर कर्मचाºयांचा आनंद द्विगुणित झाला असता. ते लवकर मिळावे. - रवी पाटील, उपाध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, केडीएमसी

....तर दिवाळी चांगली गेली असती
केडीएमटीच्या कर्मचाºयांना सप्टेंबरचा पगार मिळाला आॅक्टोबरचा नाही. जर सानुग्रह अनुदान आणि आॅक्टोबरचा आगाऊ पगार मिळाला असता तर आमची दिवाळी चांगली गेली असती. तसे झाल्याने आमची परवड कायम राहिली आहे - कृष्णा टकले, कार्याध्यक्ष, महापालिका कामगार कर्मचारी संघटना, केडीएमसी

Web Title: Advance salary to KDMC employees; The announcement of a generous grant is up in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.