क्लस्टरचा फायदा 'त्या' इमारतींना अशक्य

By admin | Published: August 20, 2015 12:53 AM2015-08-20T00:53:39+5:302015-08-20T00:53:39+5:30

क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अधिकच्या एफएसआयमुळे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव

The advantage of the cluster is that the 'buildings' are impossible | क्लस्टरचा फायदा 'त्या' इमारतींना अशक्य

क्लस्टरचा फायदा 'त्या' इमारतींना अशक्य

Next

ठाणे : क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अधिकच्या एफएसआयमुळे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेत दिली. तसेच क्लस्टर राबवताना ४० ते ४५ टक्के इमारती या अधिकृत असायला हव्यात, असे अनेक नियम असल्याने तिचा फायदा शहरातील १०० टक्के धोकादायक इमारतींना मिळेलच, याची शाश्वती नसल्याचेही पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण कधीही क्लस्टरविरोधात नव्हतो, असे घूमजाव करून प्रशासक म्हणून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.
क्लस्टरसंदर्भातील शिल्लक राहिलेली आपली भूमिका आयुक्तांनी बुधवारी सर्वसाधारण सभेमध्ये स्पष्ट केली. या वेळी त्यांनी सुरुवातीलाच घूमजाव करून माझा क्लस्टरला विरोध नव्हता, अशी भूमिका विशद केली. मुंबई आणि इतर शहरांमध्ये क्लस्टर योजना लागू केल्यानंतर याचा मोठा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर पडणार असून यासंदर्भात कोर्टात एक याचिका दाखल झाली होती. पालिका आयुक्तांनी मात्र क्लस्टरसंदर्भात माहिती देताना या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या वाढीव एफएसआयचा ठाण्यातील पायाभूत सुविधांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नसल्याचे सांगितले. भविष्यात क्लस्टर योजनेत ७५% समावेश ठाणेकरांचा असल्याने बाहेरचे हा एफएसआय वापरणार नाहीत, अशा दृष्टीनेच आम्ही अहवाल तयार करत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: The advantage of the cluster is that the 'buildings' are impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.