सायकल स्टॅण्डच्या जागेवर जाहिरात फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:30+5:302021-03-10T04:39:30+5:30

ठाणे : काही महिन्यांपूर्वी सायकल स्टॅण्डच्या उपयुक्ततेचा पुळका आलेल्या महापालिका प्रशासनाने आता डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टॅण्ड हटवून ...

Advertising billboards in place of bicycle stands | सायकल स्टॅण्डच्या जागेवर जाहिरात फलक

सायकल स्टॅण्डच्या जागेवर जाहिरात फलक

Next

ठाणे : काही महिन्यांपूर्वी सायकल स्टॅण्डच्या उपयुक्ततेचा पुळका आलेल्या महापालिका प्रशासनाने आता डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टॅण्ड हटवून उत्तुंग जाहिरात फलक उभारल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी मंगळवारी केली.

या प्रकाराला आशीर्वाद कोणाचा, संबंधित सायकल स्टॅण्डची जागा होर्डिंगसाठी का देण्यात आली, याबाबत करार केला आहे का, संबंधित जाहिरात फलकापोटी महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी किती रक्कम पडणार आहे, संबंधित जाहिरात फलकाचे हक्क देण्यात आलेल्या कंपनीचे नाव काय, सायकल स्टॅण्ड हटविण्याचे कारण काय, आदी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली आहे.

ठाणे महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या भागात ५० सायकल स्टॅण्ड उभारण्यासाठी कंत्राट दिले होते. संबंधित कंपनीने मोक्याच्या ठिकाणी जाहिराती झळकविण्यासाठी २५ स्टॅण्ड उभारले. पूर्व द्रुतगती महामार्ग, पोखरण रोड क्र. २, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आदी मोक्याच्या ठिकाणी सायकल स्टॅण्ड उभारले गेले. काही ठिकाणी अवघ्या ५०० मीटरच्या अंतरावर स्टॅण्ड उभारण्याची किमया साधली गेली. अवघ्या १७ लाख ५० हजारांच्या सायकलींच्या बदल्यात लाखो रुपयांचे हक्क व कोट्यवधींची जागा कंपनीच्या घशात घातली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधून यातून महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Advertising billboards in place of bicycle stands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.