1437 दिवसानंतर राजा मयूर येणार कारागृहाबाहेर
By admin | Published: January 5, 2016 01:22 AM2016-01-05T01:22:53+5:302016-01-05T01:22:53+5:30
जळगाव : घरकूल प्रकरणातील संशयित राजा मयूर हे 1 हजार 437 दिवसानंतर म्हणजेच जवळपास चार वर्षानंतर कारागृहाबाहेर येतील.
ठाणे : भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३० टक्के पाणीकपात करण्याचे कळविले असल्याने ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना व स्टेम कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरु वारी सकाळी ९ पर्यंत बंद राहणार आहे. तर, कळवा, मुंब्रा परिसराचा पाणीपुरवठा बुधवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
या कालावधीत घोडबंदर रोड, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार असल्याचे आवाहन पालिकेने केले आहे. एमआयडीसीने उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी ३० टक्के पाणीकपात करण्याचे कळविले असल्याने त्यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा गुरु वारी व शुक्र वारी बंद राहणार आहे.
(प्रतिनिधी)