१५ वर्षांनंतर बंदरवाडीच्या रहिवाशांना घरे; चाव्या हातात आल्यावर अश्रू तरळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:50 PM2019-07-20T22:50:13+5:302019-07-20T22:50:30+5:30

वीज, पाण्याअभावी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काढले दिवस

After 15 years houses of residents of Bandarwadi; | १५ वर्षांनंतर बंदरवाडीच्या रहिवाशांना घरे; चाव्या हातात आल्यावर अश्रू तरळले

१५ वर्षांनंतर बंदरवाडीच्या रहिवाशांना घरे; चाव्या हातात आल्यावर अश्रू तरळले

Next

भाईंदर : रेल्वेच्या जागेतील घरे तोडल्यानंतर १५ वर्षे नवघर गावामागील महापालिकेने टाकलेल्या कचºयाच्या ढिगाºयावर वीज, पाण्याअभावी असह्य जीवन जगणाºया ११३ कुटुंबांचे महापालिकेने इंद्रलोकमधील एका इमारतीत पुनर्वसन केले आहे. उकिरड्यावर जगत हक्काच्या घरांसाठी १५ वर्षे चाललेल्या संघर्षाचा अखेर सुखद असा शेवट झाला. घरांच्या चाव्या हातात मिळाल्यानंतर रहिवाशांना अश्रू अनावर झाले.

भाईंदर पूर्वेला बंदरवाडी येथे रेल्वेच्या जागेत ९० च्या दशकापासून सुमारे १३० कुटुंबे राहत होती. १९९५ पूर्र्वीच्या झोपडपट्टीवासीयांना अधिकृत ठरवले असतानाही रेल्वे प्रशासनाने मात्र हा नियम आम्हाला लागू होत नसल्याचे स्पष्ट करत महापालिकेच्या मदतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील घरे तोडली होती. तोडलेल्या झोपड्यांपैकी १२८ जणांना महापालिकेने पात्र झोपडीधारक म्हणून फोटोपास दिले होते. तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी बाधित झोपडपट्टीधारकांची नोंद करून घेत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नवघर स्मशानभूमीमागील सरकारी जागेत शहराचा कचरा टाकून केलेल्या भरावावर राहण्यास परवानगी दिली होती. तेव्हापासून बहुतांश झोपडीधारक कचºयाच्या ढिगाºयावरच झोपड्या बांधून राहत होते.

सीआरझेड व कांदळवन क्षेत्र असल्याने रहिवाशांना महापालिकेने पाण्याची जोडणी दिली नाही. वीजपुरवठाही मिळाला नव्हता. पावसाळ्यात तर परिस्थिती बिकट होत असे. अशा दुरवस्थेतही हक्काचे छप्पर मिळेल, या आशेने या कुटुंबीयांनी येथे एकदोन दिवस नाही, तर आयुष्याची १५ वर्षे काढली.
हक्काचे घर मिळावे म्हणून महापालिकेच्या मुख्यालयापासून नगरसेवक, आमदार, जिल्हाधिकारी ते सरकार दरबारी लढा दिला.

राजकारण बाजूला ठेवून दिला न्याय
पुनर्वसनाचा हक्क असूनही या रहिवाशांना इतकी वर्षे यातना सोसत राहावे लागले, याचे दु:ख वाटत होते. महापौर असताना जेव्हा हे रहिवासी मोठ्या आशेने माझ्याकडे आले, त्यावेळी ठरवले की, यांना त्यांच्या लढ्यात पूर्ण साथ द्यायची. राजकारण बाजूला ठेवून माझा प्रभाग नसताना केवळ त्यांना चांगले घर मिळावे, हाच उद्देश होता. आयुक्तांसह कार्यकारी अभियंता व महापालिकेनेही त्यांना न्याय दिला.
- गीता जैन, माजी महापौर

Web Title: After 15 years houses of residents of Bandarwadi;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.