अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयत 40 वर्षानंतर 10 वीतील माजी विद्यार्थींचा स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:58 PM2017-11-29T17:58:01+5:302017-11-29T18:29:02+5:30
महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित आले. यावेळी सर्व मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात माजी शिक्षकांना वेदमंत्र घोषात पुष्पवृष्टी करत गौरविण्यात आले.
अंबरनाथ - दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयत शिकणा-या 1977 सालच्या 10 वीतील माजी विद्यार्थींचा वर्ग पुन्हा भरविन्यात आला. तब्बल 40 वर्षानंतर सर्व सवंगडी पुन्हा भेटल्याचा आनंद या माजी विद्याथ्र्यामध्ये दिसत होता. ही भेट व्हावी आणि सर्व मित्र आणि मैत्रिन एकाच दिवशी एकत्रित यावे यासाठी माजी विद्यार्थींपैकी काही विद्यार्थींनी घेतलेली मेहनत ख-या अर्थाने आनंद देऊन गेली. 26 नोव्हेंबरला या सर्व विद्यार्थींचा एक दिवसाचा वर्ग महात्मा गांधी शाळेत भरविण्यात आला होती. यावेळी सर्व मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित करण्याची किमया साध्य करण्यात आली. त्यासाठी सोशल मिडीयाचा केलेला वापर हा ख-या अथ्र्याने फायदेशिर ठरला. एकत्रिकरणाची संकल्पना परदेशात असणारे प्रकाश किंजवडेकर यांची आणि त्यांना साथ लाभली ती कवीश नाईक, शेखर महाजन, मुकुंद जठार, ललित माटेकर, मिलिंद आठवले, सुवर्णलता साबळे, जयश्री कुलकर्णी-पाटील, नीलिमा जोशी यांची. आपल्याला घडवणारे शिक्षक यांना आवर्जून बोलवण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका जयश्री गांगल, नीता बेहेरे आणि स्मिता भातखंडे, तसेच पुरु षोत्तम चौधरी, श्रीकृष्ण जोशी, उत्तम करंदीकर असे एकूण 16 ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्र मात या माजी शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगांवकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन, वेदमंत्न घोषात पुष्पवृष्टी करत गौरविण्यात आले. एकत्रिकरणानंतर नीलिमा फडके व दत्ता आफळे यांच्या सुरेल गाण्यांचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. तर भरत करमरकर यांनी एक तडफदार पोवाडा सादर केला. पुणो, बडोदा, दापोली, अहमदाबाद, मुंबई येथे स्थायिक असणारे विद्यार्थी देखील कार्यक्र माला उपस्थित होते. सुग्रास स्नेहभोजनाने या कार्यक्र माची सांगता झाली. योगायोगाने या 77 च्या बॅचचे नेमके 77 विद्यार्थीच या प्रसंगी उपस्थित होते. आपल्या शाळेसाठी काही चांगले करण्याच्या उद्देशाने नेहमीच उपलब्ध आहोत, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. जुन्या आठवणींमध्ये रमल्याचे समाधान सगळयांच्या चेहर-यावर दिसत होते.