७५० वर्षे उलटूनही ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून - बोधले महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 05:50 PM2020-01-12T17:50:44+5:302020-01-12T17:53:23+5:30

संतांची वाणी आणि पत्रकारांची लेखणी एकत्र येते तेव्हा समाजात क्रांती घडल्याशिवाय राहत नाही असे बोधले महाराज म्हणाले.

 After 5 years, this tradition of Gyanoba and Tukaram Maharaj survived in Maharashtra - Bodhale Maharaj | ७५० वर्षे उलटूनही ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून - बोधले महाराज

७५० वर्षे उलटूनही ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून - बोधले महाराज

Next
ठळक मुद्देज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून - बोधले महाराजकै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बोधले महाराजांनी गुंफलेसंतांची वाणी आणि पत्रकारांची लेखणी एकत्र येते तेव्हा समाजात क्रांती घडल्याशिवाय राहत नाही

ठाणे: आजच्या काळात धर्म ही अफूची गोळी आहे, पुण्य भूलथाप आहे तर पाप ही धमकी आहे असा प्रकारच्या विचाराला पुरोगामी समजून प्रगत समाजव्यवस्थेत गेलो आहे असा कुठेतरी विचार व्यक्त करणारी मंडळी आपल्याला दिसतात. त्यामुळे ७५० वर्षे उलटूनही ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून आहे असे मत ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांनी ठाण्यात मांडले.
          कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बोधले महाराजांनी गुंफले. ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा ७०० - ७५० वर्षे उलटूनही कशी टिकली यावर सांगताना बोधले महाराज म्हणाले की, दहा वर्षांनतर समाजात एक माणूस चालत नाही. परंतू ज्यावेळी माणूस तिसऱ्यावेळीही निवडून येतो त्यावेळी त्याने हॅटट्रीक साधली असे म्हणतात. दहा वर्षांनंतर समाज एका व्यक्तीला मानत नाही हे समाजाचे सूत्र आहे पण ती व्यक्ती दहा वषार्नंतरही निवडून आली तर याचा अर्थ त्यातील खुबी, नस कळाली आहे. याचे कारण त्याच्या विचारांची, कार्याची समाजाला गरज वाटली किंवा समाजाच्या प्रश्नाचा त्यांच्याकडून सखोल अभ्यास आणि कार्य झालेले आहे म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा संधई दिलेली आहे. दहा वर्षे झाल्यावर माणसे माणसाला स्वीकारत नाहीत. पण ७५० वषार्नंतरही ज्ञानोबा तुकाराम मंत्र हा महाराष्ट्राच्या जीवनातील मूलमंत्र ठरतोय. या मूलमंत्राने महाराष्ट्राच्या मातीला काही दिले म्हणून आजही हा मंत्र आपल्या कानांत, मनात गुंजतोय. माणूस जातीने नव्हे तर कर्तबगारीने मोठा ठरतो हा मूलमंत्र संतांनी दिला. संतांनी नेहमी समतेचा विचार मांडला. स्त्री ही पुरूषापेक्षा उच्च वाटू नये म्हणून जुन्या काळात दक्षता घेतली जात. परंतू ज्या देशात स्त्री विकासाच्या प्रवासात नाही तो देश कधीच प्रगतीच्या वाटेने जाऊ शकत नाही आणि हा मूलमंत्र संतांनी लक्षात घेतला होता. उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सीस दी ब्रिटो यांनी चांगले भाषण केले. त्यांनी आणि मी गेली नऊ वर्षे श्री संत ज्ञानदेव तुकाराम पुरस्कार समितीवर काम केले आहे. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, मला जर साहित्याची गोडी ज्ञानदेव तुकारामांच्या वाड्.मयामुळे लागली. इतके स्पष्ट बोलणारे, पुरोगामीत्वाचे विचार समाजाला देणारे, खºया अर्थाने मानवतेचे विचारात घेऊन जाणारे ही संत मंडळी होती. एका ख्रिश्चन धर्मगुरूने संतवाड्.मयातील सिद्धांताची ही सरिता निखळ वाहती ठेवावी, त्याच्यापेक्षा संत वाड.मयातील मोठेपणा आपण कोणत्या बाजूने पहावा. मुळात आपण त्या दृष्टीकोनातून पाहतच नाही. जाती धर्माच्या पलिकडे चांगले आरोग्य आणि चांगले विचार या दोन्ही गोष्टी समाजाला आवश्यक आहे. आरोग्य नष्ट झाले तर अस्तीत्व संपेल आणि विचार विकृत झाले तर व्यक्तीसह समाजव्यवस्था अडचणीत येईल हे सांगत ते म्हणाले समाजाला संस्कार देण्याचे काम संतांनी केले असेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे, आ. संजय केळकर आणि प्रा. कीर्ती आगाशे उपस्थित होते.
 

Web Title:  After 5 years, this tradition of Gyanoba and Tukaram Maharaj survived in Maharashtra - Bodhale Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.