तब्बल सव्वा वर्षांनी मीरा भाईंदर महापालिकेला मिळाले मुख्य लेखापरीक्षक
By धीरज परब | Published: April 3, 2023 04:24 PM2023-04-03T16:24:40+5:302023-04-03T16:25:29+5:30
मीरा भाईंदर महापालिकेचा तात्पुरते प्रभारी या नावाखाली चाललेला कारभार थांबला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - अतिशय महत्वाचा मानल्या जाणाऱ्या मुख्य लेखापरीक्षक पदी अखेर सव्वा वर्षा नंतर शासनाने सुधीर नाकाडी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेचा तात्पुरते प्रभारी या नावाखाली चाललेला कारभार थांबला आहे.
महापालिकेत मुख्य लेखापरीक्षक हे अतिशय महत्वाचे पद मानले जाते व ते शासनाच्या वित्त विभागा मार्फत प्रतिनियुक्तीने भरले जाते. कारण पालिकेचा कारभार नियमानुसार व आर्थिक हिताचा होणे आवश्यक असल्याने लेखापरीक्षण विभागावर मोठी जबाबदारी असते.
मीरा भाईंदर महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक म्हणून शासन नियुक्त अधिकाऱ्याची गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बदली करण्यात आली . मात्र शासना कडून अन्य अधिकाऱ्याची नियुक्तीच केली गेली नाही. त्यामुळे महत्वाच्या ह्या पदाची जबाबदारी पालिका सेवेतील मंजिरी डिमेलो यांच्या कडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आली.
१२ जानेवारी २०२२ पासून डिमेलो ह्याच मुख्य लेखापरीक्षक म्हणून कारभार हाकत होत्या. शासनाच्या वित्त विभागाने आता सव्वा वर्षा नंतर सुधीर नाकाडी ह्यांची नियुक्ती केली आहे. नाकाडी यांनी पूर्वी सुद्धा मीरा भाईंदर महापालिकेत मुख्य लेखा परीक्षक म्हणून काम केले आहे. नाकाडी यांनी पदभार संभाळल्याने डिमेलो ह्या पुन्हा उपमुख्य लेखापरीक्षक पदी काम पहात आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"