आयुक्तांच्या दणक्यानंतर नालेसफाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:11 AM2019-06-13T00:11:01+5:302019-06-13T00:11:13+5:30

उल्हासनगर पालिका : पहिल्याच पावसात झाली पोलखोल

After the announcement of the commissioners, Nalsefi started | आयुक्तांच्या दणक्यानंतर नालेसफाई सुरू

आयुक्तांच्या दणक्यानंतर नालेसफाई सुरू

Next

उल्हासनगर : पहिल्या पावसाने नालेसफाईचा बोजवारा उडाल्यावर आयुक्तांनी मंगळवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेत नाले सफाईचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने बुधवारपासून वालधुनी नदीसह मोठया नाल्यांच्या साफसफाईला सुरूवात केली असल्याचे मुख्य स्वच्छता निरिक्षक विनोद केणे यांनी सांगितले. उल्हासनगरमध्ये पहिल्या पावसाने बोजवारा उडाल्याच्या तक्रारी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे गेल्यावर त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन साफसफाईचा आदेश दिला. तसेच भारत स्वच्छता अभियाना अंतर्गतील साफसफाई, शून्य कचरा, हगणदारी मुक्त शहर, स्वच्छतागृहाची साफसफाई, शुध्द पाणी आदींच्या कामाचे आदेश दिले.

त्यानुसार केणे व एकनाथ पवार यांनी मोठया नाल्यांच्या सफाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. वालधुनी नदीसह मोठया नाल्यांची पुन्हा सफाई सुरू झाली आहे. वालधुनी नदी पुला खालील गाळ व वाहून आलेला कचरा काढण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली होती.
्वालधुनी नदीची सफाई झाली नसल्याची ओरड नगरसेवकांसह नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी केली होती. लहान नाल्याच्या सफाई साठी रोज ३०० कंत्राटी कामगार काम करतात. खेमानी नाला, गायकवाड पाडा नाला, तानाजीनगर-समतानगर नाला, गुलशननगर नाला, रमाबाई आंबेडकर विद्यालयाजवळील नाला अद्यापही तुंबले असून कचºयात प्लास्टिक पिशव्यांचा सर्वाधिक भरणा आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.

कचरा उचलण्याची मागणी
वालधुनी नदीसह मोठया नाल्यातील काढलेला कचरा किनाºयावर टाकला जातो. नाल्यातून काढलेला कचरा त्वरित हटविण्याची गरज असते. मात्र तसे होत नसल्याने पावसामुळे किनाºयावरील कचरा पुन्हा नदीपात्रात वाहून जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी आयुक्तांकडे केला आहे.
 

Web Title: After the announcement of the commissioners, Nalsefi started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.