नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:55 AM2017-11-10T00:55:58+5:302017-11-10T00:56:06+5:30
नोटाबंदीनंतर देशातील जनतेने घर आणि सोने यांच्यामध्ये पैसे गुंतवणे कमी केले असून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले आहे
ठाणे : नोटाबंदीनंतर देशातील जनतेने घर आणि सोने यांच्यामध्ये पैसे गुंतवणे कमी केले असून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वधारतो आहे. परिणामी, नोटाबंदीनंतर देशात अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर अभिजित फडणीस यांनी ठाण्यात व्यक्त केले .
मोदी सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या निर्णयाचा आढावा घेणारे विशेष व्याख्यान सहयोग मंदिर येथे बुधवारी दीनदयाळ प्रेरणा केंद्राने आयोजिले होते.
या वेळी ‘३६५ दिवस विमुद्रीकरणाचे’ या विषयावर फडणीस यांनी मार्गदर्शन केले. देशातील महागाई ही तेल निर्यात करणाºया देशांच्या राजकारणावर अवलंबून आहे. परंतु, देशातल्या व्यवहारांच्या पारदर्शकतेमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक येत्या काळात वाढणार आहे. नोटाबंदीनंतर सुरुवातीला १५ ते २० लाख लोकांच्या नोक ºया गेल्या, अशी ओरड सुरू होती. मात्र, आता हा आकडा पाच लाखांवर आला आहे.
तसेच सध्या देशात पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मोबाइल नंबर जोडण्याची प्रक्रि या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोणतेही आर्थिक व्यवहार लपवता येणार नाहीत. उलट, देशात येत्या काळात डिजिटल क्र ांती होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.