आश्वासनानंतर स्वाभिमानचे आंदोलन मागे
By admin | Published: July 17, 2017 12:58 AM2017-07-17T00:58:37+5:302017-07-17T00:58:37+5:30
चिंचघर देवघर हा रस्ता, कुडूस येथील तुंबलेली मुख्य रस्त्यावरील गटारे, कोंढले खैरे हा रस्ता पहिल्याच पावसात धुवून गेल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : चिंचघर देवघर हा रस्ता, कुडूस येथील तुंबलेली मुख्य रस्त्यावरील गटारे, कोंढले खैरे हा रस्ता पहिल्याच पावसात धुवून गेल्याने प्रशासना विरोधात केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांनी मागण्यांच्या पुर्ततेचे लेखी आश्वासन दिले.
स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी चिंचघर देवघर हा रस्ता, कुडूस येथील तुंबलेली मुख्य रस्त्यावरील गटारे, कोंढले खैरे हा नव्याने तयार केलेला व पहिल्याच पावसात धुवून गेलेला रस्ता या सर्व कामांची दुरूस्ती करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार व बांधकाम खात्याकडे दिले होते.
मात्र या निवेदनाची दखल कुणीही घेतली नसल्याने स्वाभिमान संघटनेचे तालुका अध्यक्ष रविंद्र मेणे व जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी या कामांच्या पुर्ततेसाठी उपोषण सुरू केले होते.