कोरोनानंतर शहरी माणसांनी आपली जीवनशैली बदलण्याची गरज - डॉ. प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 04:17 PM2020-05-09T16:17:39+5:302020-05-09T16:22:25+5:30

सगळे जग झु झालंय आणि प्राणी मोकळेपणाने रस्त्यावर वावरत आहेत.

After Corona, urban people need to change their lifestyle - Dr. Prakash Amte | कोरोनानंतर शहरी माणसांनी आपली जीवनशैली बदलण्याची गरज - डॉ. प्रकाश आमटे

कोरोनानंतर शहरी माणसांनी आपली जीवनशैली बदलण्याची गरज - डॉ. प्रकाश आमटे

Next
ठळक मुद्देडॉ. प्रकाश आमटे यांनी ठाण्यातील विद्यार्थ्यांशी साधला संवादकोरोनानंतर शहरी माणसांनी आपली जीवनशैली बदलावी - डॉ. आमटेसगळे जग झु झाले , प्राणी रस्त्यावर मोकळेपणाने फिरत आहेत. डॉ. आमटे

ठाणे : कोरोनानंतर शहरातील माणसांनी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. कोरोना कधी संपेल माहीत नाही. मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल डिस्टनसिंग हा शब्द चुकीचा आहे. आपण फिजिकल डिस्टनसिंग पाळले पाहिजे. दुर्दैवाने आपण सोशल डिस्टनसिंग अजिबात पाळत नाही अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक, मॅगेसेस पुरस्कार विजेते, पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली. कोरोना डिप्रेसिंग नाही पण त्यासाठी पाळावयाचे नियम कठीण आहे. त्यामुळे घरात कुटुंबासोबत आनंदाने रहा, आपले जुने छंद जोपासा असे आवाहनही त्यांनी पुढे बोलताना केले.

   आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आयोजित संवाद मनाचा या कार्यक्रमात डॉ. आमटे यांची झूम व्हिडीओ कॉलद्वारे लेखक, निवेदक मकरंद जोशी यांनी मुलाखत घेतली. डॉ. आमटे म्हणाले, आता आपण आपल्या गरजा कमी कराव्या. आज ज्याच्याकडे भरपूर पैसे आहे तो ही लॉकडाऊनमध्येच आहे. आज सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. संकटकाळी ज्यांची आठवण होते ते कुलुपात आहेत. आज जास्त गरज आहे ती डॉक्टर, पोलिसांची. हे सगळे लढत आहेत. यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहू या. जान है तो जहाँ है. लॉकडाऊनचे सर्व नियम आपण पाळावे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका हा 65 वर्षांवरील व्यक्तीला अधिक असतो. तुलनेने लहान मुलांना हा धोका कमी असतो. कोरोनावर लस शोधण्यात संपूर्ण जग मागे लागले आहे. तोपर्यंत आपण संयम ठेवला पाहिजे. प्राणी पिंजऱ्यात कसे राहतात याचा अनुभव आपण घेत आहोत. आज सारे जग झु झालेय आणि प्राणी रस्त्यावर मोकळेपणाने फिरत आहेत. आज आपल्याला अन्न धान्याची सोय आहे परंतु आपण आपल्या जिभेचे चोचले कमी करावे. अलीकडे दारूची दुकाने उघडली तेव्हा ज्या प्रमाणात गर्दी झाली ते पाहता यातूनही कोरोनाचा धोका वाढू शकतो. आपण 50 दिवस संयम ठेवला तर आणखीन पुढेही ठेवू शकतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला कोरोनाचा धोका अधिक असल्याचे आपण ऐकले आहे. त्यामुळे या काळात आपल्याला व्यसनमुक्त होता येईल का हा ही एक चांगला संदेश आहे. त्यामुळे आपण पुढील आयुष्य चांगले जगू शकू असा सल्लाही त्यांनी दिला. सुरुवातीला हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या आठवणी त्यांनी उलगडल्या. 1974 मधले तेथील जीवन खरे आयसोलेशनचे होते असे सांगताना अनेक प्रसंग त्यांनी कथन केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक डॉ. प्रा. प्रदीप ढवळ ही सहभागी झाले. होते.

Web Title: After Corona, urban people need to change their lifestyle - Dr. Prakash Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.