आधारवाडी पाठोपाठ दिव्यातील डम्पींगला आग, डम्पींग बंद न केल्यास कचरा पालिकेच्या दारात टाकण्याचा नागरीकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:24 PM2018-03-08T17:24:24+5:302018-03-08T17:24:24+5:30

आधारवाडी पाठोपाठ ठाणे महापालिकेच्या दिव्यातील डम्पींगला रात्री आग लागल्याची घटना घडली. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे तसेच डम्पींगच्या दुर्गंधीला त्रासलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा आक्र मक पवित्रा घेतला असून डम्पींग बंद न केल्यास दिव्यामध्ये टाकण्यात येणार कचरा पुन्हा ठाणे महापालिकेत टाकण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

After dawing, firefighters warn of putting waste on municipal door | आधारवाडी पाठोपाठ दिव्यातील डम्पींगला आग, डम्पींग बंद न केल्यास कचरा पालिकेच्या दारात टाकण्याचा नागरीकांचा इशारा

आधारवाडी पाठोपाठ दिव्यातील डम्पींगला आग, डम्पींग बंद न केल्यास कचरा पालिकेच्या दारात टाकण्याचा नागरीकांचा इशारा

Next
ठळक मुद्देवांरवार आंदोलन करुनही डम्पींग बंद नाहीश्वसनाच्या विकारात वाढ

ठाणे - कल्याणमधील आधारवाडी डम्पींगला आग लागल्याची घटना ताजी असतांनाच बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास दिवा डम्पींगला आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री आग लागूनही अग्निशमन दल मात्र सकाळी ११ वाजता घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दीड तास आग विझवण्याचे प्रयत्न केल्यानंतर पाणी संपल्यामुळे अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळावरून निघून गेल्या असा आरोप येथील नागरिकांडून केला जात आहे. डम्पींगच्या बाजूलाच ४ ते ५ हजारांची वस्ती असून त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. सांयकाळी उशिरापर्यंत आग कमी झाली असली तरी धुरामुळे ती नागरीक हैराण झाले होते. दरम्यान वारंवार लागणाºया आगींमुळे तसेच डम्पींगच्या दुर्गंधीला त्रासलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा आक्र मक पवित्रा घेतला असून डम्पींग बंद करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. डम्पींग बंद न केल्यास दिव्यामध्ये टाकण्यात येणार कचरा पुन्हा ठाणे महापालिकेत टाकण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
                 ठाणे शहरातील संपूर्ण कचरा हा अनाधिकृतपणे दिवा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे या ठिकाणी सतत आगीच्या घटना घडत असतात. अनाधिकृतपणे टाकण्यात येणाऱ्या या कचऱ्यामुळे या परिसरात नागरिक अक्षरश: संतापले असून यापूर्वी अनेकवेळा हे डम्पींग बंद करण्याची मागणी दिवा परिसरातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. मात्र याची दाखल अद्याप महापालिकेने घेतलेली नाही. बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा धुराचा त्रास सहन करावा लागला. डम्पींगच्या बाजूलाच ४ ते ५ हजार लोकांची वस्ती आहे. याशिवाय येथे तीन खाजगी शाळा सुद्धा आहे. या परिसरात सतत आग लागण्याची घटना घडत असल्याने या नागरिकांचे केवळ आरोग्यच नव्हे तर त्यांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. दरम्यान सकाळी ११ वाजता पाण्याच्या दोन टँकरबरोबर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दीड वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीच संपल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना देखील पुन्हा परतावे लागले अशी माहिती दिव्यातील रहिवासी रोहिदास मुंडे यांनी दिली. या डम्पींगमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सुरु झाले आहे. यापूर्वी देखील दिवा डम्पंींग बंद करण्यासाठी महापालिकेसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र महापालिकेने या सर्व पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखविली आहे. आता पुन्हा एकदा हे डम्पींग बंद करण्यासाठी महापालिकेला पत्र देण्यात येणार असून या पत्रानंतरही डम्पींग बंद न झाल्यास हाच कचरा ठाणे महापालिकेत टाकण्याचा इशारा मुंडे आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

  • चौकट - ठाणे महापालिकेचे स्वत:चे हक्काचे डम्पींग नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून दिव्याला संपूर्ण ठाणे शहरात निर्माण होणारा कचरा टाकला जातो. हे डम्पींग बंद व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा ठाणे महापालिकेच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिव्याला जाहीर सभा घेऊन दिवा डम्पींगच्या बाबतीत बाबतीत सत्ताधारी आणि पालिका प्रशासनावर सडकून टीका केली होती. तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिव्यात जाहीर सभा घेऊन एका वर्षात दिवा डम्पींग बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरली आहे. डम्पींगच्या संदर्भात महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या वतीने यापूर्वी अनोखे आंदोलन करण्यात आले होते. अनेकवर्ष डम्पींग बंद करा या ग्रामस्थाच्या मागणीला अनेक अदोलनानंतर मनसेच्या वतीने डम्पींगच्या जागेवरच पाच दिवस तंबू ठोकून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनंतर तीन महिन्यात दिवा डम्पींगला पर्यायी व्यवस्था केली जाईल असे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मनसेला लेखी स्वरुपात आश्वासन दिल्याने मनसेचे डम्पींग हटाव आंदोलनाची हवा निघाली होती. पालिका आयुक्तांनी दिलेल्या पत्रात ठाण्यातील निघणाºया कचºयावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प सूर करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या, ही प्रक्रि या पूर्ण करून ठेकेदार यांच्यासोबत करार ही करण्यात आला. डम्पींगवर आग लागल्यास आणि धुर निघाल्यास त्यावर बाजूच्या खाडीच्या पाण्याचे फवारे मारून आगीवर नियंत्रण आणि धुरावर नियंत्रण मिळवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र हे आश्वासन देखील पूर्ण होऊ शकले नाही.





 

Web Title: After dawing, firefighters warn of putting waste on municipal door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.