अंबरनाथमधील आशिष जाधवच्या मृत्यूनंतर शहरभर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 06:45 PM2017-12-25T18:45:50+5:302017-12-25T18:54:58+5:30

बियर पिल्यावर घरी परतलेल्या आशिष जाधव या तरुणाच्या छातीत दुखू लागले. रात्रभर त्याने हा त्रस सहन केल्यावर सकाळी त्याची प्रकृती आखणीन बिघडल्याने त्याला ह्दयरोग तज्ञाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार करण्या आधीच त्याचा मृत्यू जाला होता. या प्रकरणानंतर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली होती.

After the death of Ashish Jadhav in Ambernath, rumor was reported to the city | अंबरनाथमधील आशिष जाधवच्या मृत्यूनंतर शहरभर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा

आशिष जाधव

Next
ठळक मुद्देआशिष जाधव दारू पिऊन घरी परतल्यावर झाला त्रास उपचार सुरु हायेण्या आधीच त्याचा झाला मृत्यू दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली

अंबरनाथ - रविवारी मित्रंसोबत बसुन बियर पिल्यावर घरी परतलेल्या एका तरुणाच्या छातीत दुखू लागले. रात्रभर त्याने हा त्रस सहन केल्यावर सकाळी त्याला हा त्रस असाह्य झाला. छातीत प्रचंड दुखत असल्याने त्याला त्याच्या मित्रंनी एका खाजगी रुग्णालयात उपरासाठी दाखल केले. तेथे त्याची प्रकृती आखणीन बिघडल्याने त्याला ह्दयरोग तज्ञाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार करण्या आधीच त्याचा मृत्यू जाला होता. या प्रकरणानंतर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली होती. मात्र या तरुणाचा मृत्यू काशामुळे घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
    आशिष जाधव आणि गणोश जाधव हे दोघे मित्र आपल्या इतर मित्रंसोबत रात्री एकत्रित दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पार्टी जाल्यावर हे पुन्हा आपल्या घरी सर्वाेदय नगर येथे जात असतांना पोलीसांनी त्यांना हटकले. त्यांच्यावर यावेळी दंडात्मक कारवाई केल्यावर पोलीसांनी त्यांना सोडुन दिले. मात्र घरी परतल्यावर आशिष याच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाली. त्याने हा त्रस घरी सांगितले. तसेच छातीला बाम लावुन त्याने रात्रभर झोप काढली. मात्र सकाळी उठल्यावर पुन्हा त्याला छातीत दुखण्याचा त्रस जाणवत होता. आशिषला रुग्णालयात नेण्यासाठी त्याचा मित्र गणोश आला. त्याने त्याला स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती गंभिर असल्याने त्याला अंबरनाथच्या ह्दयरोग तज्ञाकडे हलविण्यात आले. मात्र तेथे नेल्यावर आशिषचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आशिषचा मृत्यूमागचे नेमके कारण हे त्याच्या शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र आशिषचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्यासोबत असलेला मित्र गणोश जाधव याला मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्याची प्रकृती देखील बिघडली होती. त्याला देखील प्राथमिक उपचार करुन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालय त हलविण्यात आले आहे. 
    दरम्यान आशिष याच्या मृत्यृचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शहरभर दारुतुन विषबाधा झाल्याची चर्चा रंगली. एकाचा मृत्यू तर इतर अनेकजणांना त्रस झाल्याच्या चर्चा सुरु होती. मात्र वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळकृष्ण वाघ यांनी असा कोणताच प्रकार घडलेला नाही असे स्पष्ट केले आहे. तर आशिषच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी त्याचे शवविच्छेदन हे जे.जे.रुग्णालय त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 
 

Web Title: After the death of Ashish Jadhav in Ambernath, rumor was reported to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.