चार महिन्यांनंतरही ते मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:02 AM2018-10-28T04:02:01+5:302018-10-28T04:02:23+5:30

कोगदा येथील भरत सावंजी धमोडा यांच्या घराचे चार महिन्यांपूर्वी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते.

After four months they are still waiting for help | चार महिन्यांनंतरही ते मदतीच्या प्रतीक्षेत

चार महिन्यांनंतरही ते मदतीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

जव्हार : तालुक्यातील कोगदा येथील भरत सावंजी धमोडा यांच्या घराचे चार महिन्यांपूर्वी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून हे कुटुंब पाऊस, वारा व उन्हाचा सामना करीत दिवस काढीत आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून त्यांची कुणीही दखल घेतलेली नाही.
ते चार महिन्यापासून जव्हार तहसील कार्यालयात अनेक वेळा चक्रा मारीत आहेत. आठवड्यातून तीनदा तालुक्याच्या ठिंकाणी येण्यासाठी त्यांना पदरमोड करावी लागत आहे. जून महिन्याच्या सुरवातीला वादळीवाऱ्यामुळे त्यांच्या घराचे छप्पर उडाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या घराची मोठे नुकसान झाले होती. मात्र त्या घटनेला चार महिने उलटूनही धमोडा कुटुंबाला महसूल प्रशासनाकडून कोणतीही आर्थिक मद्दत मिळाली नसल्याने त्यांची बिकट स्थिती आहे.
जव्हार तालुक्यातील अनेक आपत्तीग्रस्त कुटुंब असून त्यांची नैसिर्गक नुकसान झाली आहे. मात्र प्रत्येकी आपत्तीग्रस्त कुटुंबाला आर्थिक नुकसान ५ ते १० हजार नुकसान भरपाई घेण्यासाठी दहा चक्र ा मारल्याचे आपत्तीग्रस्त कुटुंबांने सांगितले. आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आम्ही तहसील कार्यालयात अनेक वेळा फेºया मारूनही नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे आम्हीही वैतागलो आहे.

त्या आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या घराची नुकसान भरपाई लवकरच मिळेल. परंतु काहीकामुळे नुकसान भरपाई देण्यास उशीर झाला.
- संतोष शिंदे, तहसीलदार, जव्हार

Web Title: After four months they are still waiting for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.