सरकारी कर्मचाऱ्यांची मते ठरली बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:47 PM2019-05-24T22:47:21+5:302019-05-24T22:48:03+5:30

चुकीच्या पद्धतीने मतदान : ईटीटीपीविषयी जनजागृतीची गरज

After getting government employees votes | सरकारी कर्मचाऱ्यांची मते ठरली बाद

सरकारी कर्मचाऱ्यांची मते ठरली बाद

Next

- सुरेश लोखंडे 


ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची गुरुवारी ठिकठिकाणी मतमोजणी झाली. ईव्हीएम मतदानयंत्रांतील सर्व मतदान ग्राह्य धरण्यात आले. मात्र, सरकारी सेवेतील काही मतदारांनी पोस्टल बॅलेटपेपरच्या साहाय्याने मतदानाचा हक्क बजावला. परंतु, या बॅलेटपेपरद्वारे मतदानाची पद्धत माहीत नसल्यामुळे काहींनी ते चुकीच्या पद्धतीने केले. यामुळे तिन्ही मतदारसंघांतील पोस्टल बॅलेटपेपरची १२६४ मते बाद ठरली आहेत.


जिल्ह्णातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये सरकारी नोकरीनिमित्त मतदारसंघापासून लांब वास्तव्यास असलेले, सैन्यदलात असलेले आणि परदेशात वास्तव्य असलेले पण या मतदारसंघाचे मतदार असलेले आदींनी पोस्टल बॅलेटपेपर आणि ईटीटीपी या दोन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला.


ठाणे लोकसभा निवडणुकीत तीन हजार ८३२ मतदारांनी पोस्टल बॅलेटपेपरने मतदानाचा हक्क बजावला. यातील तीन हजार ३१९ मतदान ग्राह्य धरले. तर, ४५२ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांचे मत बाद ठरवण्यात आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी लोकमतला सांगितले. यातील उर्वरित ६१ मतदारांनी नोटाचा वापर केला.


कल्याण लोकसभेसाठी दोन हजार ७३७ मतदारांनी पोस्टल बॅलेट पेपरने मतदानाचा हक्क बजावला. त्यातील दोन हजार ३२१ जणांचे मत ग्राह्य धरले, तर ३७ मतदारांनी नोटाचा वापर केला. पण, ३७९ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांचे मत बाद ठरले आहे. भिवंडी लोकसभेचे मतदार असलेल्या तीन हजार ८३२ मतदारांनी मतदान केले. परंतु, यातील ४३३ जणांचे मतदान बाद केले, तर ४२ जणांनी नोटाचा वापर करून मतदानाचा हक्क बजावला.

बॅलेटपेपरची माहिती नाही
नऊ हजार ४११ मतदारांनी या पोस्टल बॅलेटपेपरने मतदानाचा हक्क बजावला आहे; परंतु यातील १ हजार २६४ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांची मते बाद ठरवण्यात आली.

Web Title: After getting government employees votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thane-pcठाणे