मुंबईनंतर ठाण्यातही करमाफीची लवकरच घोषणा, महापौरांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 05:07 PM2022-01-02T17:07:25+5:302022-01-02T17:08:12+5:30

महापौर नरेश म्हस्के यांची माहिती

After Mumbai, tax exemption will be announced in Thane soon, informed the mayor | मुंबईनंतर ठाण्यातही करमाफीची लवकरच घोषणा, महापौरांनी दिली माहिती

मुंबईनंतर ठाण्यातही करमाफीची लवकरच घोषणा, महापौरांनी दिली माहिती

Next
ठळक मुद्देकोरोना काळात महापलिकेचे आर्थिक परिस्थिती ढासळली असून करमाफीमुळे पालिकेच्या तिजोरीवर आणखीन ताण येणार आहे

ठाणे - मुंबई पाठोपाठठाणे महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फूट घरांच्या कर माफीचा निर्णय लवकरच होणार असून त्या पद्धतीच्या हालचालींना वेग आला आहे. ठाणे महापालिकेच्या मागील महासभेत कारमाफीचा प्रस्ताव मंजूर झाला असून सदर प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला आहे, प्रशासकीय तपासण्यासाठी त्यावर काम सुरु असून लवकरच मुंबई प्रमाणे ठाण्यात कारमाफीचे घोषणा करण्यात येणार असल्याचे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले. 

ठाणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने ठाणेकरांना 500 चौरस फूट घरांना करमाफी देणार असे वचन दिले होते. त्यानुसार ठाणे महापलिकेची तयारी पूर्ण झाली आहे. आता त्या वचनाची पूर्तता करण्यात येणार असून, महानगरपालिकेचा ठराव नुसार पालिकेच्या नियमात बदल करून त्यावर मंत्री मंडळात निर्णय घेण्यात येईल व राज्यपाल यांच्याकडे पाठवले जाईल असे देखील म्हस्के यांनी यावेळी सांगितले. 

कोरोना काळात महापलिकेचे आर्थिक परिस्थिती ढासळली असून करमाफीमुळे पालिकेच्या तिजोरीवर आणखीन ताण येणार आहे. मालमत्ता कर हा महापलिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत या करापोटी कोटी रुपये जमा होतात.500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी दिली तर वर्षाकाठी पालिकेच्या तिजोरीत सुमारे १५० कोटी रुपये तूट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान करमाफीमुळे कोविड काळात ठाणेकरांना नवीन वर्षात दिलासा मिळणार आहे. 

पालिकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले होते, मात्र या निर्णयाला तब्बल 4 वर्ष उलटले असल्याने अनेकवेळा विरोधक आक्रमक होताना दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना लवकरच कारमाफीचे घोषणा करणार असून या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करावे, विरोधकांनी उगचाच टीका करण्यास सुरुवात करू नये असे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: After Mumbai, tax exemption will be announced in Thane soon, informed the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.