तब्बल दीड वर्षांनी अभिनय कट्टयावर ‘पुन्हा एकदा तिसरी घंटा’; कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 03:36 PM2021-10-23T15:36:17+5:302021-10-23T15:36:31+5:30
कोरोनाचे सावट आल्यानंतर सर्व क्षेत्राप्रमाणे कलाक्षेत्रही ठप्प झाले. कलाकारांना ओळख मिळवून देणारा अभिनय कट्टाही बंद करावा लागला
ठाणे : कोरोनामुळे खंडीत झालेला अभिनय कट्टा तब्बल दीड वषार्ंनी सुरू होत आहे. कलाकारांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अभिनय कट्टायवर पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजणार असल्याने रंगकमीर् आणि रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अभिनय कट्ट्याचे सवेर्सवार् किरण नाकती यांनी अभिनय कट्टा सुरू होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर रसिक प्रेक्षक आणि कलाकार मंडळींकडून आनंद व्यक्त केला जात आहे. कोरोनानंतर असलेला रविवारचा पहिला कट्टा सुरू होत आहे.
कोरोनाचे सावट आल्यानंतर सर्व क्षेत्राप्रमाणे कलाक्षेत्रही ठप्प झाले. कलाकारांना ओळख मिळवून देणारा अभिनय कट्टाही बंद करावा लागला. परंतू कोरोनाच्या काळात हाच अभिनय कट्टा हजारो ठाणेकरांचा आधार देखील झाला. याच अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात अडकलेल्या ठाणेकरांना मदतीचा हात देण्यात आला. आता हा अभिनय कट्टा पुन्हा एकदा रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. नाकती यांनी गेल्या काही वषार्ंपुवीर् सुरू केलेला अभिनय कट्टा रविवार २४ आ’क्टोबर पासून सुरू होत आहे. कोरोनाच्या मध्यंतरीच्या काळात अभिनय कट्टयाचे काही भाग आ’नलाईन घेण्यात आले होते. आता हा कट्टा आ’फलाईन सुरू होत असून रसिकांना प्रत्यक्षात कला सादरीकरण पाहण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. अभिनय कट्टा सुरू होत असला तरी कोरोनाचे पुर्ण नियम पाळले जाणार असल्याचे नाकती यांनी लोकमतला सांगितले. पुन्हा एकदा कलागुणांना वाव देऊ या, रंगकर्मींनो मोकळा श्वास घेऊ या असे म्हणत अभिनय कट्ट्याचे कलाकार मंडळी रसिकांच्या भेटीला येत आहेत. ज्यांना या कट्ट्यावर येणे शक्य नाही त्यांच्यासाठी आ’नलाईन कट्ट्याची देखील सोय केली असल्याचे नाकती म्हणाले.