ठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू

By जितेंद्र कालेकर | Published: May 27, 2020 08:36 PM2020-05-27T20:36:53+5:302020-05-27T20:42:18+5:30

कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस मुख्यालयासह अनेक पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले. आतापर्यंत १११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून सात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २९४ पोलीस देखिल विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

After the quarantine of 294 police in Thane, all returned to duty | ठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर पुन्हा डयूटीवर झाले रुजू

आतापर्यंत १११ पोलिसांना कोरोनाची लागण

Next
ठळक मुद्देआतापर्यंत १११ पोलिसांना कोरोनाची लागणसात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आतापर्यंत १४ अधिकाऱ्यांसह १११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील हायरिस्कमधील ४६ अधिकाऱ्यांसह २४८ कर्मचारी असे २९४ पोलीस मंगळवारपासून पुन्हा डयूटीवर रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेकांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिसांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.
कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस मुख्यालयासह अनेक पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले. या कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील अनेक पोलिसांना घरातच तसेच केंद्रात विलगीकरणामध्ये रहावे लागल्यामुळे त्यांना काही काळ विश्रांती मिळाली होती. यातील बहुतांश जणांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे हे सर्वजण आता पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. * असे आहे संख्याबळ
ठाणे पोलीस मुख्यालयात एका अधिका-यासह १०३, मुंब्रा पोलीस ठाण्यात १७ अधिका-यांसह ६९, वर्तकनगर तीन अधिका-यांसह ३० कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे २१ असे आतापर्यंंत २९४ पोलीस हे रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* आतापर्यंत १४ अधिकारी आणि ९७ कर्मचारी अशा १११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यात एका महिला कर्मचा-याचा मृत्यु झाला. तर सात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली. सध्या सात अधिकारी आणि ५४ कर्मचारी अशा ६१ जणांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
* पोलीस मुख्यालयात सर्वाधिक २२ त्यापाठोपाठ मुंब्रा १५ तर कळव्यात १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्य राखीव दलासह शीघ्र कृती दलही कळवा, मुंब्रा आणि वागळे इस्टेट भागात तैनात केल्याने पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Web Title: After the quarantine of 294 police in Thane, all returned to duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.