विस्कळीतपणाच्या ‘शोभायात्रे’नंतर ढोल पथकांना नो-एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:36 AM2018-04-11T03:36:38+5:302018-04-11T03:36:38+5:30

यंदा नववर्ष स्वागतयात्रेत काही ढोलपथकांनी यात्रेसोबत चालताना वादन करण्यामध्ये वेळ खर्च केल्याने शोभायात्रेत विस्कळीतपणा आल्याने पुढील वर्षीच्या यात्रेत ढोल-ताशा पथकांना ‘नो एण्ट्री’, अशी भूमिका श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.

After the 'Shobhitra' of the disorder, the drum squaders have no-entry | विस्कळीतपणाच्या ‘शोभायात्रे’नंतर ढोल पथकांना नो-एण्ट्री

विस्कळीतपणाच्या ‘शोभायात्रे’नंतर ढोल पथकांना नो-एण्ट्री

Next

अनिकेत घमंडी 
डोंबिवली : यंदा नववर्ष स्वागतयात्रेत काही ढोलपथकांनी यात्रेसोबत चालताना वादन करण्यामध्ये वेळ खर्च केल्याने शोभायात्रेत विस्कळीतपणा आल्याने पुढील वर्षीच्या यात्रेत ढोल-ताशा पथकांना ‘नो एण्ट्री’, अशी भूमिका श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.
पुढील वर्षी लेझीम, झांज आणि ध्वज पथकांना संधी देण्याचा मानस असून तसा प्रस्ताव संस्थानच्या आगामी बैठकीत मांडणार असल्याचे संस्थानचे विश्वस्त प्रवीण दुधे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शोभायात्रेला १९ वर्षे झाली. आधी पुणे-मावळ आदी भागातून ढोल पथके बोलावली जायची. त्यानंतर शोभायात्रेमुळेच डोंबिवलीत ढोल पथकांची बांधणी झाली. आता ती पथके स्थिरस्थावर झाली आहेत. ढोलपथक हे ‘स्थिर’ वादन असून लेझीम, झांज, ध्वज पथक हे ‘चल’ वादन आहे. त्यामुळे ती शोभायात्रेसोबत सहजपणे पुढे जातील, वेळ वाचेल, विस्कळीतपणा येणार नाही. तसेच ही संस्कृतीदेखील महाराष्ट्राची शान व परंपराच आहे. त्यामुळे आगामी वर्षाकरिता शाळाशाळांमधून लेझीम, झांज पथकांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल. बहुतांश विश्वस्त, सदस्य, पदाधिकारी ही भूमिका मान्य करतील, असा विश्वास दुधे यांनी व्यक्त केला. ढोलपथकांचा प्रत्यक्ष यात्रेत सहभाग नसला तरी त्यांनी एका ठिकाणी वादन करावे. यासाठी त्या पथकांच्या प्रमुखांसमवेत समन्वय साधला जाणार आहे. ढोल पथकांचा यात्रेत सहभाग नसेल, तर ध्वनिप्रदूषणालाही आळा बसेल, असे ते म्हणाले. लेझीम, झांज पथकांचा आवाज ढोल-ताशांच्या तुलनेत कमी असतो, तसेच त्यात जास्तीतजास्त जणांना सहभागी होता येते.
>अर्धा तास वाया गेल्याचे नोंदवले मत
यंदाची शोभायात्रा ही भागशाळेपासून वेळेत निघाली, पण पूर्व-पश्चिम उड्डाणपूल येथे शोभायात्रेची शृंखला तुटली. पश्चिमेला द्वारका हॉटेलनजीकच्या चौकात एक पथक वादन करत बसले. त्यामुळे हे घडले.शोभायात्रेचे एक टोक पश्चिमेकडून पूर्वेला रामनगरभागात आले, पण शृंखला तुटल्याने यात्रा विस्कळीत झाली. संस्थानचे दामले आणि दुधे यांची विस्कळीत यात्रे पूर्ववत करताना धावपळ झाली.आयोजक आणि ढोल पथक यांच्यात भरयात्रेदरम्यान चढ्या आवाजात चर्चा झाली, अखेरीस पथकाने शोभायात्रेसोबत चालण्याचा प्रयत्न केला. यामुळे यात्रेचा अर्ध्या तासाहून अधिक वेळ गेला. त्यामुळे आगामी वर्षापासून शोभायात्रेत ढोल पथकांना प्रवेश न देण्याच्या निर्णयावर दामले यांनी शिक्कामोर्तब केले.

Web Title: After the 'Shobhitra' of the disorder, the drum squaders have no-entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.