जिभेच्या कर्करोगावरील यशस्वी उपचारानंतर ‘ती’ लागली गाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:42+5:302021-09-09T04:48:42+5:30

२४ वर्षीय तरुणीची जिभेच्या कर्करोगावर यशस्वी मात लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : जिभेच्या कर्करोगामुळे २४ वर्षांच्या रेश्मा शहा हिला ...

After successful treatment of tongue cancer, she started singing | जिभेच्या कर्करोगावरील यशस्वी उपचारानंतर ‘ती’ लागली गाऊ

जिभेच्या कर्करोगावरील यशस्वी उपचारानंतर ‘ती’ लागली गाऊ

googlenewsNext

२४ वर्षीय तरुणीची जिभेच्या कर्करोगावर यशस्वी मात

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : जिभेच्या कर्करोगामुळे २४ वर्षांच्या रेश्मा शहा हिला तिचा छंद असलेला गाणे गाणेच काय धड बोलणे, खाणेपिणेसुद्धा अवघड होऊन बसले होते. मीरारोडच्या एका खासगी रुग्णालयात रेडिओथेरपी तसेच केमोथेरपीच्या साहाय्याने रेश्मावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. कर्करोगावर मात करत रेश्मा पुन्हा गाऊ लागल्याने तिचा व तिच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

इव्हेंट मॅनेजर असलेल्या रेश्माला जिभेवरील व्रणांमुळे तोंड दुखणे, बोलण्यास असमर्थता जाणवणे तसेच जेवताना, गिळताना त्रास होणे अशा समस्या सतावू लागल्या. सुरुवातीला तिने घरगुती उपचार केले. परंतु त्याचा काही फारसा फरक पडला नाही. जसजसा वेळ निघून गेला तसतसा तिचा त्रास आणखी वाढू लागला. त्यामुळे तिने वेगवेगळ्या डॉक्टर्स, रुग्णालये येथे उपचार केले.

ऑटोलार्यनगोलॉजिस्ट आणि हेड एण्ड नेक ऑन्को सर्जन डॉ. चंद्रवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली तिच्यावर रेडिओथेरपी तसेच केमोथेरपीच्या साहाय्याने यशस्वी उपचार करण्यात आले. जी रेश्मा जिभेच्या उजव्या बाजूस असलेल्या ४.५ सेंटिमीटरच्या व्रणामुळे बोलू शकत नव्हती, खाऊ किंवा गिळू शकत नव्हती, ती आता सहजपणे या साऱ्या गोष्टी करत आहे. रेश्माला असलेली गायनाची आवड तिला जोपासता येत असून आता ती पूर्वीसारखी गाऊ लागली आहे.

डॉ चंद्रवीर सिंह म्हणाले की, रेश्मा जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती तेव्हा तिला तोंडातल्या अल्सरमुळे काहीच करता येत नव्हते. एमआरआय, एक्स-रे आणि सीटी स्कॅन तपासण्या व बायोप्सीमध्ये तिला जिभेचा कर्करोग झाल्याचे उघड झाले. जिभेपासून ते मानेच्या उजव्या बाजूच्या लिम्फ नोड्सपर्यंत तो पसरला होता.

जिभेच्या कर्करोगाला तोंडाचा कर्करोग म्हणूनही संबोधले जाते. तंबाखूचे सेवन, धूम्रपान, अल्कोहोलचे अतिसेवन, तीक्ष्ण दातामुळे घर्षण होऊन होणारा व्रण, लोहाची कमतरता, अशक्तपणा आणि इतर पौष्टिक मूल्यांच्या कमतरतेमुळे हा आजार होऊ शकतो. मानेच्या लिम्फ ग्रंथींमध्ये पसरू शकते. जिभेच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. जिभेच्या कर्करोगाच्या सुमारे पाच ते सहा गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत, असेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

..........

वाचली

Web Title: After successful treatment of tongue cancer, she started singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.