करवाढीनंतरही वसुली असमाधानकारक, ठामपाने राबविल्या अनेक योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:45 AM2019-11-30T00:45:32+5:302019-11-30T00:45:53+5:30

ठाणे शहर विकास विभागाच्या उत्पन्नावरून वादळ पेटले असतानाच मालमत्ताकराच्या वसुलीवरही परिणाम झाला आहे.

After tax hike, recovery is unsatisfactory, many schemes implemented by the firm | करवाढीनंतरही वसुली असमाधानकारक, ठामपाने राबविल्या अनेक योजना

करवाढीनंतरही वसुली असमाधानकारक, ठामपाने राबविल्या अनेक योजना

ठाणे : शहर विकास विभागाच्या उत्पन्नावरून वादळ पेटले असतानाच मालमत्ताकराच्या वसुलीवरही परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ३४.३५ कोटींची वाढ झाली असली, तरी ती समाधानकारक नाही. मालमत्ताकर विभागाने २७ नोव्हेंबरपर्यंत ३५४.१७ कोटींची वसुली केली आहे.

मागील वर्षी या विभागाला ५५० कोटींचे लक्ष्य दिले होते. यंदा त्यात वाढ करून ते ६५० कोटी ठेवले आहे. निवडणुकीच्या काळात या विभागाकडून ४२ कोटींच्या आसपास वसुली झाली खरी, मात्र एकूणच उत्पन्न पाहता मागील वर्षीच्या तुलनेत सध्या तरी ती अधिकची नाही. त्यामुळे शहर विकास विभागाप्रमाणेच या विभागाच्याही परिस्थितीत होते की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. मालमत्ताकर वसुली वाढावी म्हणून या विभागाने विविध योजना राबविल्या. त्यानुसार, लोकांच्या घरात ही बिले पोहोचवण्यात आली होती. त्यामुळेच पालिकेच्या मालमत्ताकरात यंदा वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीअंतर्गत सर्वाधिक १०५.८४ कोटींची वसुली झाली आहे. तर, सर्वात कमी वसुली १९.५४ कोटी ही मुंब्रा प्रभाग समितीमधून झाली आहे.

कस्टमाइज्ड सॉफ्टवेअरमुळे झाला फायदा

महापालिकेने या आर्थिक वर्षात करनिर्धारण व वसुलीसाठी विविध योजना राबविल्या आहेत. यामध्ये कस्टमाइज्ड सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. करदात्यांना आपले करनिर्धारण तपशील पाहणे, डाउनलोड व कर प्रदान करण्यासाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध केली असून करदात्यांना एसएमएसद्वारे कर रक्कम जमा झाल्याची खात्री कर डेबिटकार्ड, क्रेडिटकार्ड, पीओएस मशीनद्वारे विनाशुल्क करसंकलन सुविधा महापालिकेच्या २० करसंकलन केंद्राबरोबरच मोबाइल व्हॅनद्वारेदेखील कर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तरीसुद्धा, अद्यापही वसुलीत हवी तशी भर पडलेली नाही. त्यामुळे पुढील चार महिन्यांत वसुली वाढविण्यासाठी पालिकेकडून कसे प्रयत्न होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

 

Web Title: After tax hike, recovery is unsatisfactory, many schemes implemented by the firm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.