ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त साकारला गेला अफजलखान वध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 04:28 PM2018-03-05T16:28:16+5:302018-03-05T16:28:16+5:30

ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त अफजलखान वध साकारला गेला. यावेळी मोठ्या संख्येने रसिक वर्ग उपस्थित होता. 

Afzal Khan slaughter was executed on the occasion of Shiv Jayanti on Thane acting shoot | ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त साकारला गेला अफजलखान वध 

ठाण्यातील अभिनय कट्टयावर शिवजयंती निमित्त साकारला गेला अफजलखान वध 

googlenewsNext
ठळक मुद्दे अभिनय कट्ट्याच्या  माध्यमातून कलात्मकरीत्या  महाराजांना मानाचा मुजरा कट्ट्याचे अध्यक्ष  दिग्दर्शक किरण नाकती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पणजय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी दुमदुमला संपूर्ण परिसर

ठाणे : रविवारी सर्वत्र शिवजयंतीची साजरी होत असतानाच  अभिनय कट्ट्याच्या  माध्यमातून कलात्मकरीत्या  महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. विविध कलाकृतींच्या माध्यमातून कलाकारांनी छत्रपतींना अभिवादन करत संपूर्ण कट्टा परिसर हा छत्रपतींच्या विचारांनी तेजोमय झाला होता. 

    प्रथेप्रमाणे प्रार्थनेने कट्ट्याची सुरवात झाली आणि त्या नंतर प्रेक्षक प्रतिनिधी मुकुंद सुळे आणि माधवी सुळे या दांपत्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले. कट्ट्याचे अध्यक्ष  दिग्दर्शक किरण नाकती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करण्यात आला. पूढे एकपात्रीद्वारा सादरीकरणात्मक कार्यक्रमास सुरवात झाली.यामध्ये बालकलाकारांनी आपली अदाकारी दाखवत रसिकांच्या टाळ्या लुटल्या ज्या मध्ये आर्य माळवे याने मनातल्या मनात,पूर्वा तटकरे हिने पतंगाची काटाकाट, अद्वैत मापगावकर याने एका रात्रीत हिरो,प्रांजल धरला हिने डोके दुखी आमची आणि टीचर्सची  वैष्णवी चेउलकर हिने मी आणि दात या एकपात्री सादर केल्या. मोठ्या गटातील शुभांगी गजरे हिने पेश केलेली राजमाता जिजाऊ ही नाट्य छटा लक्षवेधी ठरली.तर सई कदम हिने अफजल खानच्या वधावर आधारित पोवाडा दमदाररित्या वठवत वातावरण भगवे केले.पुढे चिन्मय मौर्य याने क्लास एके क्लास,निमिष पिंपरकर याने ग्रामर चले जावं, अखिलेश जाधव याने पुस्तक जत्रेत एक व्हीझिट तर प्रथम नाईक याने विमानातील धम्माल या एकपात्रीच्या माध्यमातून बच्चे  कंपनी सुद्धा कमी नाही हे पटवून दिले.

   या नंतर कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी महाराजांना एका शेतकऱ्याच्या मुलाने लिहिलेले पत्रवाचन केले, पत्राच्या माध्यमातून आज महाराजांचे विचार आचरण करण्याची किती गरज आहे, फक्त महाराजांच्या नावावर होत असलेलं राजकारण, मावळ्यांची एकनिष्ठता अशा अनेक गोष्टींचा रोखठोक उलगडा करत  महाराजांची शिवजयंती साजरी करण्यामागची भावना व्यक्त  केली . तसेच  नितीन बानगुडे पाटील रचित मला शिवाजी व्हायचंय ह्या वर आधारित सादरीकरणाच्या माध्यमातून कट्ट्याच्या कलाकारांनी जनमानसांत महाराजांप्रति असलेले स्थान अधोरेखित केले.एका  मुस्लिम मुलीची  (विणा छत्रे) अब्रू धोक्यात असताना ती आसरा म्हणून एका अशा हिंदू मुलाच्या (पियुष भोंडे) घराचा आधार घेते ज्या घरात महाराजांची तसबीर असते व आजही छत्रपतींचा केवळ फोटो बघून महिलांना सुरक्षित वाटतं, इतका मोठा राजा महाराष्ट्राला लाभला होता हे सांगण्याचा प्रयत्न  कट्ट्याच्या कलाकारांमार्फत करण्यात आला. सादरीकरनातील 'शिवाजी हे फक्त नाव नाही  तर शिवाजी हे सर्वोच्चतेंच प्रतीक आहे...' ह्या वाक्या नंतर जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी  संपूर्ण परिसर  दुमदुमला. अभिनय कट्ट्याच्या शिवजयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे अफजलखान वध ही कलाकृती पार पडली. कदिर शेख दिग्दर्शित या सादरीकरणामध्ये अफजल खानच्या शिताफीचा डाव छत्रपतींनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने  त्याच्यावरच कसा  उलटवला ह्याचे हुबेहूब चित्रण सर्वच पात्रांनी ताकदीने  निभवले . महाराज आणि अफजल खान भेटीसाठी उभारलेला शामियाना, महाराजांची गळाभेट, अफजल खानाचा फसलेला कपटी डाव आणि त्त्यानंतर छत्रपतींनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा.. हे सर्व पाहून इतिहासाचीच पुनरावृत्ती होत असल्याचा भास उपस्थितांना झाला. आणि सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज कि जय हा एकच जयघोष घुमू लागला. हे सादरीकरण प्रभावी पणे वठवण्याची कामगिरी कदिर शेख (शिवाजी महाराज),सुरज परब (अफजल खान), वैभव जाधव (जिवाजी महाल) ,  कुंदन भोसले (सय्यद बंडा ) व इतर  सहाय्यक कलाकारांनी  केली. कार्यक्रमाअंती कट्ट्याच्या बालकलाकारांनी सुरज परब दिग्दर्शित आम्ही मावळे मावळे या गाण्यावर सामूहिक नृत्य सादर करत रसिकांच्या टाळ्या लुटल्या. सरते शेवटी उपस्थित मान्यवरांचे अध्यक्ष किरण नाकती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन  आदरातिथ्य करण्यात आले व किरण नाकती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना शुभेच्छा देत शिवजयंतीच्या या अनोख्या कार्यक्रमाचा  समारोप केला. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा कट्ट्याचे कलाकार माधुरी कोळी यांनी पार पाडली

Web Title: Afzal Khan slaughter was executed on the occasion of Shiv Jayanti on Thane acting shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.