पुन्हा पाणी पेटले!

By Admin | Published: January 8, 2016 02:06 AM2016-01-08T02:06:30+5:302016-01-08T02:06:30+5:30

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गुरुवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक गाजली. तेव्हा कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी पालिकांसह २७ गावांच्या

Against water! | पुन्हा पाणी पेटले!

पुन्हा पाणी पेटले!

googlenewsNext

ठाणे : अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गुरुवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक गाजली. तेव्हा कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी पालिकांसह २७ गावांच्या पाणीपुरवठ्याचे सुमारे पाच कोटी रुपयांचे बिल थकल्याचा गौप्यस्फोट एमआयडीसीने केला आणि ही बैठक वादळी ठरली.
जिल्ह्यातील प्रमुख शहरांची लोकसंख्या वाढत असून तेथे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी जादा पाण्याची गरज असल्याचा आणि त्यासाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी मांडला.
सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील आमदार आक्रमक झाले होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिकांकडे पाणीपट्टीची मोठी रक्कम थकीत असल्याचे एमआयडीसीने उघड केले. तरीही, एकाही गावाचा किंवा शहराचा पाणीपुरवठा तोडलेला नाही, हेही निदर्शनास आणले. सद्य:स्थितीत या महापालिकांना दररोज सुमारे ६५० एमएलडी सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचा दावाही एमआयडीसीने केला. महानगरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याच्या गरजेवरही या वेळी चर्चा झाली.
कोणत्याही शहराचा किंवा गावाचा पाणीपुरवठा बंद नाही. तोडलेला नाही, असे उत्तर एमआयडीसीकडून मिळताच कल्याण-डोंबिवली परिसरातील लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा खोडून काढला. कल्याण पूर्वेतील कमी दाबाच्या पाण्याचा मुद्दा गणपत गायकवाड यांनी लक्षात आणून दिला.
२७ गावांतील गावकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही लोकप्रतिनिधींनी केला.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही पाणी तोडले नसल्याचे उत्तर दिले. पाणी स्रोत वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
कल्याण- शहराच्या पूर्व भागातील नेतिवली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी टंचाई असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरीक रस्त्यावर उतरले. त्यांनी कल्याण शीळ रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. नेतिवली परिसराचा पाणी पुरवठा एमआयडीसीने कल्याण डोंबिवली महापालिकेस सांगूनच बंद केला होता. त्यामुळे नेतिवली परिसराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेकडून एमआयडीसीकडे बिलाच्या पोटी पाच कोटी येणे आहे.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंका सुरेश जगताप यांनी सांगितले की, या लाईनवरुन नेतिवली परिसराला एमआयडीसीकडून ०.३ दश लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात होता. हा पाणी पुरवठा महापालिकेस केला जात होता. महापालिकेकडून पाणी नागरीकांना पुरविले जात होते. त्यामुळे पाण्याचे नियोजन महापालिकेने करावे हे उघड आहे. या लाईनवर एमआयडीसीला पाणी ग्राहक नाही. त्यामुळे नेतिवलीचे पाणी पुरवठा करणारे कनेक्शन एमआयडीसीने बंद केले आहे. पाणी पुरवठा बंद करताना महापालिकेस सांगितले होते.
शहापूरसाठी १६० कोटींचे माऊली धरण
ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची पाणीटंचाई संपवण्यासाठी कर्जत तालुक्यात माऊली धरण बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १६० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. या धरणाचा सर्वाधिक म्हणजे ८० टक्के लाभ शहापूर तालुक्यातील गावांना होणार आहे. पुढील २५ वर्षांसाठी होणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन या धरणाचे काम हाती घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले. पण सत्ता कोणाचीही असू दे, या धरणाचे काम मीच करणार, असे फलक आमदार पांडुरंग बरोरा यांनी लावल्याचे खासदार कपिल पाटील यांनी निदर्शनास आणले. त्या धरणासाठी मी आधीपासून झटत असल्याचा दावा त्यांनी केला. आपण सर्व मिळून श्रेय घेऊ, असे सांगून बरोरा यांनी विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. या धरणाला मंजुरी मिळाली तर शाई धरणाला अडचण येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Against water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.