आगरी शालेन चल बाला... दप्तर, पुस्तक झेऊन चल..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:04 AM2018-05-04T02:04:23+5:302018-05-04T02:04:23+5:30

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाळा ठाण्यात सुरू झाली आहे. यात पहिल्या दिवशी आलेल्या भाषाप्रेमींनी आगरी भाषेचे धडे गिरवले.

Agari shalen Chal Baala ... the paper, the book is going on ..! | आगरी शालेन चल बाला... दप्तर, पुस्तक झेऊन चल..!

आगरी शालेन चल बाला... दप्तर, पुस्तक झेऊन चल..!

Next

ठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाळा ठाण्यात सुरू झाली आहे. यात पहिल्या दिवशी आलेल्या भाषाप्रेमींनी आगरी भाषेचे धडे गिरवले. यात आगरी भाषेतील बाराखडीपासून प्रत्येक शब्दांचा उच्चार कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले. केवळ ठाणे नव्हेच तर पुणे, अलिबाग, मुंबई, बाळकुम, भिवंडी अशा विविध भागांतील आगरी अन् बिगरआगरी प्रशिक्षणार्थ्यांचाही सहभाग होता.
आगरी भाषेची विविध अंगे कळावी, त्यातील साहित्याची गोडी कळावी, या अनुषंगाने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी ‘आगरी शाला’ हा बोलीभाषा संवर्धनार्थ नवीन प्रयोग सुरू केला. या आगरी शाळेच्या पहिल्या वर्गात १५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात आगरी अन् बिगरआगरी प्रशिक्षणार्थ्यांचाही सहभाग होता. या आगरी शाळेच्या पहिल्या वर्गात गजानन पाटील, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील आणि सर्वेश यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश पाटील यांनी आगरी भाषेतील लुप्त होत चाललेल्या काही शब्दांची आठवण करून दिली. मोरेश्वर पाटील यांनी ही भाषा फक्त समाजापुरती मर्यादित नसून तिची व्याप्ती विशाल आणि सर्वसमावेशक आहे, हे समजावून दिले. गजानन पाटील यांनी आगरी बोलीचा व्यवहारात कसा वापर करता येऊ शकतो, हे समजावून सांगितले. सर्वेश यांनी आगरी बोली जर एका दिवसात शिकायची झाल्यास सोपे नियम सांगून ‘ळ’ या अक्षराऐवजी ‘ल’, ‘ण’ या अक्षराऐवजी ‘न’, ‘ड’ या अक्षराऐवजी ‘र’ असे शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न केला की, आगरी भाषा तुम्हाला सहज बोलता येऊ शकेल, असे सांगितले. या शाळेचे पुढील वर्ग शनिवार-रविवारी भरणार असून एकाच दिवशी दोन सत्रांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. पुढील ‘आगरी शाळेचे वर्ग’ ५-६ मे, १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी कशेळी येथील शाळेत ४ ते ६ या वेळेत भरणार आहे. या वर्गांसाठी प्रा. सदानंद पाटील, प्रा. एल.बी. पाटील, डॉ. अनिल रत्नाकर, दया नाईक, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील, गजानन पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Web Title: Agari shalen Chal Baala ... the paper, the book is going on ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.