ठाण्यात आजारपणाला कंटाळून सातव्या मजल्यावरुन उडी घेत वृद्धाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:33 PM2018-07-10T22:33:07+5:302018-07-10T22:38:42+5:30

एकाकीपणा आणि आजारपणाला कंटाळलेल्या दशरथ मांजरेकर या वृद्धाने सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

Aged senior suicides taking a plunge from the seventh floor in the Thane district | ठाण्यात आजारपणाला कंटाळून सातव्या मजल्यावरुन उडी घेत वृद्धाची आत्महत्या

घराच्या गॅलरीतून घेतली उडी

Next
ठळक मुद्देकासारवडवली येथील घटनाघराच्या गॅलरीतून घेतली उडीघटनेने परिसरात खळबळ

ठाणे : आजारपणाला कंटाळून दशरथ जिवाजी मांजरेकर (७७,रा. कृष्णा ग्रीनलँड पार्क, कासारवडवली, ठाणे) या वृद्धाने सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दशरथ हे सेवानिवृत्त असून ते कृष्णा ग्रीनलँड पार्क या इमारतीमध्ये भूपेंद्र मांजरेकर (३७) या मुलासोबत वास्तव्याला होते. भूपेंद्रच्या आईचे अर्थात दशरथ यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तर भूपेंद्रचा २०१६ मध्ये घटस्फोट झालेल्या असल्याने घरात हे दोघेच असायचे. दशरथ यांना फेब्रुवारी २०१६ मध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता. तेंव्हा पासून ते आजारीच होते. घरातील एकाकीपणा आणि आजारपणाला ते कंटाळले होते. शिवाय, त्यांची स्मरणशक्तीही कमकुवत झाली होती, असे भूपेंद्रने पोलिसांना सांगितले. मंगळवारी भूपेंद्र टीव्ही पहात होता. त्यावेळी त्याचे वडील दशरथ हे त्यांच्या सातव्या मजल्यावरील घराच्या गॅलरीत उभे होते. त्याचवेळी भूपेंद्रला एका मित्राने फोनकरुन त्याचे वडील इमारतीच्या खाली कोसळून पडल्याचे सांगितले. त्याने तातडीने धाव घेतली तोपर्यंत डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला होता. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. जाधव हे करीत आहेत.

Web Title: Aged senior suicides taking a plunge from the seventh floor in the Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.