भिवंडीत काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेचं तीव्र निदर्शन
By नितीन पंडित | Published: July 18, 2024 04:02 PM2024-07-18T16:02:11+5:302024-07-18T16:04:26+5:30
मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिक, भारतीय जवान शहीद होत आहेत. केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भिवंडी - जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्धव सेनेकडून जोरदार निदर्शने करीत या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिक, भारतीय जवान शहीद होत आहेत. केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या सूचनेने व जिल्हाप्रमुख मनोज गगे, शहर प्रमुख प्रसाद पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटिका वैशालीताई मेस्त्री, जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी यांच्या उपस्थितीत भर पावसात झालेल्या या आंदोलनात युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडी पदाधिकारी, उद्धव सेनेच्या अंगीकृत संघटना पदाधिकारी, व्यापारी संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.