केंद्रीय मंत्री आठवलेंच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 08:01 PM2019-08-06T20:01:41+5:302019-08-06T20:06:54+5:30
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची शासकीय जयंती ३ ऑगष्ट रोजी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आठवले यांनी साठे यांच्या काव्यावर विडंबर करीत त्यांचा अवमान केला.
ठाणे : केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या काव्याचे विडंबन करून अवमान केला. यामुळे आठवलेंच्या विरोधात राज्यभर तणाव निर्माण होऊन संतापलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील ठाणेजिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ‘जोडे मारो आंदोलन’ छेडले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत सोमवारी जाहीर निषेध केला.
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची शासकीय जयंती ३ ऑगष्ट रोजी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आठवले यांनी साठे यांच्या काव्यावर विडंबर करीत त्यांचा अवमान केला. एवढेच नव्हे तर तेथील वाजंत्री कलाकार मंडळींना देखील शिवीगाळ केल्याचा आरोप करीत राज्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद ठाणे येथे देखील पाहायला मिळाले.
येथील शासकीय विश्रामगृहासमोर आठवले यांच्या केंद्रीय मंत्री मंडळाचा राजीनामा त्वरीत घ्यावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आदी मागण्योसह कार्यकर्त्यांनी आठवलें विरोधात विविध घोषणा देत ‘जोडे मारो आंदोलन’ छेडले आणि जाहीर निषेध केला. यावेळी या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन सादर केले.
..............
फोटो - ०६ठाणे आंदोलन