आरटीईच्या शालेय प्रवेशासाेबत माेफत गणवेशासाठी उपाेषण
By सुरेश लोखंडे | Published: July 2, 2024 08:59 PM2024-07-02T20:59:56+5:302024-07-02T21:04:36+5:30
त्रस्त पालकांनी व महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपाेषण सुरू केले आहे.
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली विद्यार्थ्यांना माेफत शालेय प्रवेशासह गणवेश,शैक्षणिक साहित्य मोफत मिळावे या मागण्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे, यांच्यासह त्रस्त पालकांनी व महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारपासून आमरण उपाेषण सुरू केले आहे.
शिक्षणाचा हक्क या कायद्याने गणवेश,बुक्स, शैक्षणिक साहित्य दोन दिवसात विद्यार्थ्यांना मोफत न दिल्यास शालेय संस्थांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन ठाणे महानगर पालिका उप आयुक्त सचिन पवार यांनी दिले. मात्र त्यास विलंब झाल्यामुळे या पालकांनी व मातांनी अमरण उपाेषणाला प्रारंभ केला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी विदयार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी, खाजगी शाळांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी येथील शासकीय विश्राम गृहाच्या समोर या अमर उपाेषणाला प्रारंभ केला आहे. मनमानी करणाऱ्या शाळांवर त्वरीत करवाई करण्याची मागणीही या उपाेषणकर्त्यांनी केली आहे.