कंत्राटी कामगारांसाठी युनियनचे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 04:02 PM2021-11-01T16:02:38+5:302021-11-01T16:03:32+5:30

या कामगारांना तत्काळ कामावर पूर्ववत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

agitation in front of the thane municipal headquarters of the union for contract workers | कंत्राटी कामगारांसाठी युनियनचे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

कंत्राटी कामगारांसाठी युनियनचे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: ठाणे  महापालिकेच्या फायलेरिया विभागातील औषध व धूर फवारणी करणाऱ्या सुमारे २००  कंत्राटी  कागारांचे काम दिवाळीच्या तोंडावर बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याच्या विरोधात सोमवारी म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या कामगारांना तत्काळ कामावर पूर्ववत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

फायलेरिया विभागात काम करणारे अनेक कायम कर्मचारी मागील ५ वर्षात सेवानिवृत्त झाल्याने आधिच कमगारांची संख्या तुटपुंजी आहे. कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणो टळलेला नाही. त्यातच मलेरिया, डेग्यू या सारख्या आजारांचा फैलाव ठाणे महापालिका क्षेत्नात झपाट्याने होत आहे. अशा स्थितीत ज्या कंत्नाटी कामगारांवर औषध व धूर फवारणी करण्याची मदार होती त्यांचे काम बंद केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा दावा यावेळी युनियनच्या वतीने करण्यात आला. तसेच वर्षानुवर्षे फायलेरिया विभागात ट्रॅक्टरवर काम करणा:या सुमारे १४ कामगारांना कामावर न घेता संबंधीत कंत्नाटदाराने त्यांच्या जागी नवीन कामगारांची भरती करून उच्च न्यायालयाने दिलेले आदेश तसेच कामगार मंत्र्यांनी दिलेले आदेश धाब्यावर बसविले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दिवाळीचा सन तोंडावर आलेला असतानाही पाणी खात्याकडील कंत्नाटी कामगारांना मागील दोन महिन्याचा पगार तसेच बोनस अदा करण्यात आलेला नाही. संबंधीत कंत्रटदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे या कंत्नाटी कामगारांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचेही त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून फायलेरिया विभागातील कंत्नाटी कामगारांचे काम तात्काळ पूर्ववत सुरू करावे, पाणी खात्याकडील कंत्नाटी कामगारांना मागील दोन महिन्यांचे वेतन व बोनस तात्काळ अदा करावा, फायलेरिया विभागाकडील ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या जुन्या १४ कामगारांना तात्काळ कामावर हजर करून घ्यावे अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे चिटणीस चेतन अंबोनकर आणि बिरपाल भाल यांनी केले आहे.

Web Title: agitation in front of the thane municipal headquarters of the union for contract workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.