दिव्यात बाधित ३२० कुटुंबांचे २५ ऑगस्टपासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:05+5:302021-08-24T04:45:05+5:30
मुंब्राः दिवा स्टेशन ते दिवा जंक्शन सर्कल या रस्त्याच्या रुंदीकरणाची मोहीम ठाणे महानगर पालिकेने हाती घेतली ...
मुंब्राः दिवा स्टेशन ते दिवा जंक्शन सर्कल या रस्त्याच्या रुंदीकरणाची मोहीम ठाणे महानगर पालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेत साधारण २२ इमारतींमधील ३२०हून अधिक कुटुंबे बाधित होणार आहेत. त्यांचा विचार न करता महापालिका जबरदस्ती आणि दडपशाहीने रूम आणि गाळे खाली करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बाधितांनी केला आहे. याविरोधात तसेच बाधितांचे म्हणणे ठामपा ऐकून घेत नसल्याच्या निषेधार्थ २५ ऑगस्टपासून दिवा - शीळ रस्त्यावर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सध्या येथे अस्तित्त्वात असलेल्या रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग व बेकायदेशीरपणे रस्ता अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून तसेच रिक्षा थांबा हटवून रस्ता मोकळा केल्यास रस्ता प्रशस्त होईल. तसे केल्यास येथील रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता भासणार नाही, असा दावाही संघटनेने ठामपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
.