आगरायनच्या महाराष्ट्र दौऱ्यास सुरुवात, ठाण्यातील उपक्रम आता महाराष्ट्रभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 03:39 PM2018-07-15T15:39:45+5:302018-07-15T15:48:31+5:30
ठाण्यात अनेक महाविद्यालये आणि विविध ठिकाणी कवितांचे कार्यक्रमे गेल्यानंतर आगरायन या मैफलीने बोलीभाषा जतनाच्या उद्देषार्थ महाराष्ट्र दौरा करण्याचे ठरविले आहे.
ठाणे : ठाणे,पालघर,मुंबई येथे विविध ठिकाणी २८ आगरायन काव्यमैफलीचे प्रयोग केल्यानंतर महाराष्ट्र दौर्यातील पहिला प्रयोग रायगड मधील म्हसळ्यात पार पडला. प्रस्तुत प्रयोग म्हसळा पंचायतीच्या गटशिक्षक अधिकारी गजानन साळुंखे यांनी आयोजीत केला होता. आगरायनच्या या मैफलीत विविध बोलीतील कवितांचे सादरीकरण झाले.
कार्यक्रमाची सुरवात प्रकाश पाटील यांनी गाण्याच्या तालावर गणेशाच चित्र रेखाटुन केली आणि नैतिकतेवर आधारीत ‘मी ज बोल्लु त माझा तोंड दिसतं’ ही आगरी कविता सादर केली. त्यानंतर सुमेध जाधव यांनी कवीच्या मनाच्या भावना व्यक्त करीत ‘रुदाली’ ही हिंदी कविता सादर केली. कवी दीप पारधे यांनी गड्ड किल्ले या ऐतिहासिक वास्तुंची आपण केलेली दुर्देशा आपल्या ‘महाराज’ या कवितेतून सांगीतली. सर्वेश तरे यांनी मराठी प्रेम कविता सादर करीत देशप्रेमावरील ‘पाकिस्तान कवरा आमचे ठान्या आवरा’ ही कविता सादर केली. मोरेश्वर पाटील यांनी धुरांडा ही एकोपा राखण्याचे आवाहन करणारी आगरी कविता सादर केली.गजानन पाटील यांनी शिक्षणाचे महत्व सांगणारी आगरी कविता सादर केली. त्याचबरोबर मैफलीत मालवणी,वैदर्भीय,मराठवाडी,हिंदी बोलीतील कविताही सादर झाल्या. प्रस्तुत कार्यक्रम खास म्हसळा तालुक्यातील शिक्षक वर्गासाठी घेण्यात आला होता तसेच कार्यक्रमात २०० हून अधिक शिक्षकांची उपस्थिती होती. म्हसळा पंचायच समितीचे सभापती उज्वला सावंत, उपसभाती मधुकर गायकर,पंचायत समिती सदस्या छाया म्हात्रे आदी मान्यवर आदींची शेवट पर्यत उपस्थित होते. आगरायन दीड तासंचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आग्रहाने यंदा तीन तासांचा झाला. पुढील आगरायन चा महाराष्ट्र दौरा आकाशवाणी मुंबई तसेच कोल्हापुरला होणार असल्याचे आगरायनचे प्रमुख गजानन पाटील यांनी सांगीतले. बोली भाषा जतन व्हावी तिचा दैनंदिन जीवनाज वाढावा व्हावा या उद्देशाने ठाण्यातील कवी गजानन पाटील,सर्वेश तरे तसेच प्रकाश पाटील यांनी आगरायन काव्य मैफील सुरू केली. या मैफलीचा प्रारंभ ठाण्यातील बी एन बांदोडकर येथुन झाला आणि बघता बघता मैफलीचे ठाण्यात मोह विद्यालय,ज्ञानसाधना तसेच विविध ठिकाणी एका वर्षात २५ प्रयोग झाले. आता ठाण्यातील विविध प्रयोगानंतर कवी गजानन पाटील,सर्वेश तरे आणि प्रकाश पाटील यांनी मैफलीचा महाराष्ट्र दौरा करण्याचे योजले असुन याचा पहिला दौरा रायगड मधील म्हसळा तालुक्यात दि १३ जुन रोजी संपन्न झाला.