मुंब्रा ते मुंबई वातानुकूलित बस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:34+5:302021-07-14T04:45:34+5:30
मुंब्रा : येथील कल्याणफाटा चौक (दत्तमंदिर) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान मंगळवारपासून ठामपाच्या परिवहन सेवेने वातानुकूलित ...
मुंब्रा : येथील कल्याणफाटा चौक (दत्तमंदिर) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान मंगळवारपासून ठामपाच्या परिवहन सेवेने वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. तिचा शुभारंभ गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून करण्यात आला. स्थानिकांच्या मागणीनुसार परिवहन समितीचे सदस्य शमिम खान यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या सेवेमुळे मुंब्रा तसेच आजूबाजूच्या परिसरातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे. यावेळी ठामपाचे विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, परिवहनचे सभापती विलास जोशी, राकाँचे ठाणे जिल्हा (शहर) अध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते.