ठाणे सिव्हीलच्या १५० रूग्णांच्या टेंटमध्ये वातानुकुलित सेवा !
By सुरेश लोखंडे | Published: March 25, 2024 06:12 PM2024-03-25T18:12:09+5:302024-03-25T18:12:22+5:30
रूग्णाना गारेगार हवेचा लाभ मिळवता येणार आहे.
ठाणे : येथील सिव्हील रुग्णालयात आता रुग्णांना उष्म्याची झळ पोहोचणार नाही, असे दखल घेतली जात आहे. या रुग्णालयातील तब्बल १५० खटांच्या टेंट (तंबू) बंदिस्त असून त्यातील हवा गरम आहे. परंतु आता या टेंट मध्ये वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असल्यामुळे रूग्णाना गारेगार हवेचा लाभ मिळवता येणार असल्याचे वास्तव येथील सिव्हील रूग्णालयात दिसून आले आहे.
येथील सिव्हील रूग्णालयाच्या भव्य इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे. त्यासाठी तब्बल नऊ महिन्यांपूर्वी सिव्हील रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम हाती घेतले आहे. पण रूग्णांच्या सेवेत खंड पडू नये, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वागळे इस्टेट मनोरुग्णलय शेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचे सिव्हील रुग्णालय सुरू केले आहे. रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा असून, दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात ३४६ खाटा असून या पैकी सुमारे १५० खाटा या टेंट मध्ये आहेत. आता उष्मा वाढल्याने टेंट मधील वातावरण गरम होत आहे. त्यावर मात करण्यासाठी रुग्णाच्या सोयीसाठी टेंट वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत.
ठाणे शहराचे तापमान दिवसागणिक वाढत आहे. उन्हाचा पारा ४० अंशवर आले आले असले तरी, सिव्हील रुग्णालयात टेंट मध्ये कुलर फॅन आणि वातानुकूलित यंत्र बसवले जाणार आहेत. टेंटच्या तीन भागात जनरल, मेडीसिन, महिला, ओर्थो इत्यादी विभागासाठी खाटा आहेत. कायमच रुग्णांनी भरलेल्या टेंटमध्ये या उन्हाळ्याच्या दिवसात वातावरण उष्म मात्र आता रुग्णांच्या सोयीसाठी गारवा निर्माण केला जाणार आहे.
.............
सध्या तापमान वाढल्याने उष्माघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सकाळी १० ते ४ या वेळेत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. फिरताना टोपी, पाण्याची बाटली, छत्री, ओढणी सोबत ठेवावी. त्यास अनुसरून सिव्हीलमध्ये वातानुकुलीत सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हील रुग्णालय)
................
सरकारी रुग्णालयात सामान्य रुग्णांना फारशी चांगली सेवा मिळत नाही. परंतु सिव्हील रुग्णालयात टेंटचा कक्ष वातानुकूलित होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. खाजगी रुग्णालयातील वातावरण प्रमाणे सिव्हील रुग्णालयात देखील गारवा रुग्णांना मिळणार आहे.
संतोष पवार (रुग्णाचे नातेवाईक, ठाणे पश्चिम)