वातानुकुलित यंत्राला आग; घरातील साहित्य जळाले! दिव्यात घडला धक्कादायक प्रकार
By कुमार बडदे | Updated: May 10, 2024 00:24 IST2024-05-10T00:23:17+5:302024-05-10T00:24:11+5:30
या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही

वातानुकुलित यंत्राला आग; घरातील साहित्य जळाले! दिव्यात घडला धक्कादायक प्रकार
कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः बंद असलेल्या घरातील वातानुकुलित (एसी) यंत्राला लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळाल्याची घटना दिव्यात गुरुवारी रात्री घडली. दिवा आगासन रस्त्याजवळील गणेश नगर मधील चिन्मय अपार्टमेंन्ट या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील रुम नंबर ८०१ मध्ये रहात असलेल्या नरेंद्र पवार यांच्या रुममधील वातानुकुलित यंत्राला गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागली तेव्हा सदरचा रुम बंद होता.
याबाबतची माहिती स्थानिक नागरीकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यांच्या कडून ही माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनांच्या मदतीने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आग विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु आग लागलेले वातानुकुलित यंत्र, घरातील सिलिंग फॅन, फर्निचर आगीत जळाले असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.