रेतीबंदरनजीकच्या ट्रॅकवर हवा ओव्हर ब्रीज!

By admin | Published: August 28, 2015 12:12 AM2015-08-28T00:12:52+5:302015-08-28T00:12:52+5:30

शहराचा द एन्ड समजल्या जाणाऱ्या रेतीबंदर रोडनजीक गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. त्या पाठोपाठ तेथून शहरभर व बाहेर जाणा-या वाहनांचीही संख्या वाढली आहे.

Air over bridge on the sandbank track! | रेतीबंदरनजीकच्या ट्रॅकवर हवा ओव्हर ब्रीज!

रेतीबंदरनजीकच्या ट्रॅकवर हवा ओव्हर ब्रीज!

Next

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली
शहराचा द एन्ड समजल्या जाणाऱ्या रेतीबंदर रोडनजीक गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. त्या पाठोपाठ तेथून शहरभर व बाहेर जाणा-या वाहनांचीही संख्या वाढली आहे. असे असूनही या ठिकाणच्या दिवा-वसई मार्गावरील रेल्वेचे फाटक ही वाहनचालकांसाठी मोठी समस्या ठरले आहे. या ठिकाणाहून धावणा-या मालगाड्यांसह अन्य लांबपल्याच्या गाड्या व मेमू ट्रेन आदींची वाहतूक सुरु असते. परिणामी अनेकदा गेट बंद झाल्याने वाहनांची कोंडी होते. त्यासाठी या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूलाची (रोड ओव्हर ब्रीज) ची नितांत गरज आहे.
काही दक्ष नागरिकांनी अंडरपासचाही पर्याय सुचवला, परंतू नजीकच खाडी असल्याने तो पर्याय तितकासा योग्य नाही. मोठागांव-ठाकुर्लीचे रहिवासी या समस्येने त्रस्त आहेत. पूर्वी या ठिकाणी पाण्याची समस्या होती, त्यासाठी रेल्वे लाइननजीकच विहिर असून तेथून पाणी भरण्यात येत असे. आता तेथे स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात आल्याने ती समस्या बहुतांशी प्रमाणात संपुष्टात आली. याच ठिकाणी खाडीलगतच स्मशानभूमी असून सध्या तिचे पॅगोडा पद्धतीने नूतनीकरण होत आहे. रस्ते तुलनेने चांगले असले तरीही रेल्वे फाटकाच्या ठिकाणी गेट बंद झाल्यावरही छोट्या जागेतून दुचाकी कसाबसा मार्ग काढते, पण ते जीवघेणे ठरू शकते, मात्र त्याकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. याच ठिकाणाहून शहरातील विशेषत: पश्चिमेकडील बहुतांशी घरगुती व सार्वजनिक मोठी मंडळांचे व पूर्वेकडील निवडक मंडळांचे गणपती विसर्जन याच ठिकाणी होते. त्या मंडळांनाही या फाटकामुळे अडथळा होतो. परिणामी रात्री-मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरु असते. ही स्थिती बदलण्यासाठीही तेथे रेल्वे ओव्हर ब्रीज होणे गरजेचे आहे. बहुतांशी शाळकरी मुले, त्यांचे पालक गेट बंद असतांनाही केवळ वेळ पाळण्यासाठी रुळ ओलांडून मार्गस्थ होतात. कचरा उचलण्यासाठी मोठी गाडी येथे येऊ शकत नाही, त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना चाळीच्या ठिकाणी व्यक्तीश: डस्टबिन देण्यात आले आहे. आता बहुतांशी प्रमाणात घंटागाडी येत असते. त्यामुळे काही ठिकाणचा अपवाद वगळता कच-याची समस्या कायम आहे. खाडी किना-यालगतच गणेश घाट आहे, त्याचेही काम सुरु असून सुशोभिकरण करण्यात येत आहे. तेथून नजीकच्या गावांमध्ये जाण्यासाठी खासगी बोटी चालविण्यात येतात, साधारणत: माणशी १० रुपये आकारुन ही सुविधा देण्यात येते. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेची मात्र कोणतीही हमी देण्यात येत नाही. ही सुविधा सुरक्षित करून मगच ती महापालिकेतर्फे उपलब्ध करून द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.

Web Title: Air over bridge on the sandbank track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.