अजय-अतुल यांच्या गाण्यांनी ठाणेकर सैराट... कळव्यात `अजय-अतुल लाईव्ह'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:11 PM2018-04-30T16:11:53+5:302018-04-30T16:22:16+5:30

कळव्यात आयोजित करण्यात आलेल्या गावदेवी कार्निवल मध्ये अजय अतुल याना लाईव्ह ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.

'Ajay-Atul Live' by Ajay-Atul songs in Thanekar Sairat ... | अजय-अतुल यांच्या गाण्यांनी ठाणेकर सैराट... कळव्यात `अजय-अतुल लाईव्ह'

अजय-अतुल यांच्या गाण्यांनी ठाणेकर सैराट... कळव्यात `अजय-अतुल लाईव्ह'

Next
ठळक मुद्देअजय-अतुल यांच्या गाण्यांनी ठाणेकर सैराटकळव्यात `अजय-अतुल लाईव्ह' पहिल्यांदाच अजय-अतुल त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट ठाणेकरांच्या भेटीला

ठाणे - मराठी चित्रपट संगीताला एकावेगळ्याच स्तरावर नेणारी संगीतकार जोडी म्हणजेअजय-अतुल. `अगंबाई अरेच्चा..', `सावरखेड एकगाव', `जत्रा' यांसारख्या चित्रपटांपासून ते अगदी`सैराट'मधील गाण्यांपर्यंत अजय-अतुलचीप्रेक्षकांच्या मनावर नेहमीच छाप पडताना दिसली. त्यातही या संगीतकार जोडीची काही गाणीम्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. रविवारीठाणे-कळव्यातील रसिकांसाठी मंदार  केणी यांनी `अजय-अतुल लाईव्ह' याभव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मराठी संगीताला एक वेगळीच उंची गाठून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर ते आहे अजय-अतुल. त्यांच्या संगीताने केवळ मराठी रसिकांनाचनाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही भूरळ घातलीआहे. पहिल्यांदाच अजय-अतुल त्यांचा एकलाईव्ह कॉन्सर्ट घेऊन ठाणेकरांच्या भेटीला आलेहोते. मंदार केणी यांनी या कार्यक्रमाचे आयोजनकेले होते. रविवारी सैराट या अनोख्या कलाकृतीला एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांसाठी खास संगीताची मेजवानी मंदार केणी यांनी रसिकांना उपलब्ध करुन दिली. `नटरंग' या नमनने अजय- अतुल यांच्या संगीतमैफलीला सुरुवात झाली. त्यानंतर देवीला वंदनकरत `दुर्गे दुर्गेघट भारी' हे लोकप्रिय गाणे त्यांनी सादर केले. आई भवानी, नदी पल्याड, लख्खपडला प्रकाश अशा गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. नवरी आली, वाट दिसू दे रे देवा, अभी मुझ मेकही अशी भावनिक गाणीही त्यांनी सादर केली.तसेच अप्सरा आली, वाजले की बारा सारख्याअत्यंत गाजलेल्या गाण्यांवर रसिकांना तालधरायला त्यांनी भाग पाडले. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणाऱया सैराटचे सुमधूर संगीत कोण बरे विसरु शकेल? या संगीतातील जादू होती ती लंडन येथील सिंफनी ऑर्केस्ट्राची. मात्र यावेळी या ऑकेस्ट्राशिवायगायलेल्या गाण्यांवर तेव्हढेच प्रेम रसिकांनी केले. त्याचबरोबर रसिकांनी कधीही न पाहिलेल्या, ऐकलेल्या काही गाण्यांची कडवीही यावेळी अजय-अतुल यांनी या कार्यक्रमात गायली. या दोनतासांच्या संगीत मैफलीमध्ये अजय-अतुल यांच्याकारर्किदीतील अजरामर अशी 20-25 गाणीसादर झाली. या लोकप्रिय जोडीला साथदेण्यासाठी यावेळी इंडियन आयडॉल फेमअभिजित सावंत, सुप्रसिद्ध तरुण गायकदिव्यकुमार, गायिका योगीता गोडबोले-पाठक, प्रियांका बर्वे ही मंडळी उपस्थित होती. मराठी रसिक इतके सुजाण आहेत की आमच्याप्रत्येक गाण्याची सुरुवात झाली की त्यांना कळते. त्यामुळे यावेळी वेळ न घालवता लोकांना एकाहूनएक सरस गाणी ऐकवण्यासाठी कोणताही होस्ट नठेवण्याचे आम्ही ठरवले आहे. सोबतच याकॉन्सर्टमध्ये डान्सरही असणार नाहीत, असेसांगत अगदी प्रमाणिकपणे आपली गाण्यावरचीश्रद्धा अजय यांनी रसिकांसमोर मांडली. त्यावरठाणेकरांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात भरभरूनप्रेम दिले. तसेच आपले वादक हे आपल्याकार्यप्रेमाचे प्राण असतात, त्यामुळे त्यांना आम्हीआमचे कुटुंब मानतो, अशी ग्वाही त्यांनी यावेळीदिली. कार्यक्रमाला लोकनेते गणेश नाईक, आमदारजितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, ठामपासभागृह नेते नरेश म्हस्के, माजी विरोधी पक्ष नेतेनजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, परिषा सरनाईक, पूर्वेश सरनाईक, ठामपा विरोधी पक्षनेते मिलिंदपाटील, नगरसेवक मुपुंद केणी, नगरसेविका सौ. प्रमिला केणी, माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, प्रकाश बर्डे, तकी चेऊलकर, आरती गायकवाड, वर्षा मोरे,मनाली पाटील, मनिषा साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 'Ajay-Atul Live' by Ajay-Atul songs in Thanekar Sairat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.