मराठी कवयित्रींच्या अजरामर गीतांनी बहरला ब्रह्मांड कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:17+5:302021-09-22T04:44:17+5:30
ठाणे : बहिणाबाई चौधरी, संत जनाबाई, शांता शेळके, इंदिरा संत, वंदना विटणकर, शांता जोशी, अश्विनी शेंडे या चतुरस्र मराठी ...
ठाणे : बहिणाबाई चौधरी, संत जनाबाई, शांता शेळके, इंदिरा संत, वंदना विटणकर, शांता जोशी, अश्विनी शेंडे या चतुरस्र मराठी कवयित्रींची बालगीतांपासून ते लोकगीत, नाट्यसंगीत, लावणी, चित्रपटगीते यांचा समावेश असलेली बहारदार मराठी गाणी सादर करत गायकांनी काव्य व गीत यातील मर्मबंध चपखल साधला.
ब्रह्मांड कट्ट्याने रसिक श्रोत्यांसाठी बहारदार गीतांची भेट आणली. रविवारी ऑनलाइनद्वारे ‘मर्मबंध काव्य गीतांचे’ हा कार्यक्रम सादर केला. गायिका ऋजुता देशपांडे, संपदा दळवी व बालकलाकार विवान देशपांडे यांनी ही बहारदार गाणी सादर केली. गायनाबरोबरच निवेदनाची धुरा ऋजुता व संपदा यांनी सांभाळली.
शरद शिधये यांनी संवादिनी व सिद्धार्थ वैद्य यांनी तबला साथ, तर हृषीकेश पंडित व पार्थ घाग यांनी साईड रिदमवर साथ दिली. कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव व अध्यक्ष महेश जोशी यांनी कलाकारांचे स्वागत केले.
------------------