अक्षय कारभारी यंदाच्या ‘महापौर श्री’किताबचा मानकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 09:01 PM2018-12-16T21:01:26+5:302018-12-16T21:01:46+5:30

खारेगावच्या अपोलो जिमला मिळाले सांघिक विजेतेपद

Akshay Karbhari's 'Mayor Shree' Kitab Honors | अक्षय कारभारी यंदाच्या ‘महापौर श्री’किताबचा मानकरी 

अक्षय कारभारी यंदाच्या ‘महापौर श्री’किताबचा मानकरी 

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा  संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  महापौर श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत  अक्षय कारभारी याने यंदाचा २१ वा महापौर श्री हा किताब पटकावला तर खारेगावच्या अपोलो जिमने सांधिक विजेतेपद पटकावले. महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते व खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख परितोषिक देऊन  गौरविण्यात आले.

याप्रसंगी सभागृह नेते नरेश म्हस्के, ज्योष्ठ नगरसेवक अशोक वैती, स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे,परिवहन समिती राजेंद्र महाडिक, उप आयुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, माजी नगरसेवक मंदार विचारे,भारत श्री विजेते प्रशांत बबन चव्हाण, गिरीश शेटे,आंतरराष्ट्रीय पंच विनायक केतकर, क्रीडा संघटक रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना, ठाणे महानगरपालिका खेळाडूंच्या पाठीशी नेहमीच उभी असून पुढील वर्षी महापौर श्री पुरस्काराची रक्कम रूपये ५० हजार करण्यात येईल असे आश्वासन महापौरांनी दिले.

       या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद अपोलो जिम खारेगाव तर उप विजेतेपद सांघिक विजेतेपदी अपोलो जिम कळवा यांनी पटकावले.  सर्वोत्तम शरीर  सौष्ठव प्रदर्शक(बेस्ट पोजर )म्हणून विजय हरी गोग्स(श्री स्वामी समर्थ जिम)यांने किताब पटकावला.तर प्रथम उपविजेता अरुण काथोड भोईर(अपोलो जिम खारेगाव) द्वितीय उप विजेता आनंद महादेव पाटील(अपोलो जिम खारेगाव),व तृतीय उपविजेता संतोष लक्ष्मण पाटील(अपोलो जिम खारेगाव) हे ठरले.


          ठाणे महापौर चषक २०१८ २०१९ ही स्पर्धा एकूण ४ गटात पार पडली या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

गट पहिला

१)       पुरषोत्तम इरनक(देवा जिम हेल्थ  क्लब)
२)      परुशुराम बुरोंडकर(अपोलो जिम खारेगाव)
३)      सिद्धेश घरत(विटावा)
४)      गणेश जाधव (एन.बी बॉडी क्लब भिवंडी)
५)     अभय मढवी((अपोलो जिम खारेगाव)
६)     अमर इंदुलकर(श्री मावळी मंडळ,ठाणे )
७)     विशाल देसाई(अपोलो जिम खारेगाव)

गट दुसरा

१)स्वप्नील सुरेश वाघमारे (अपोलो जिम कळवा )
२) अरुण कामोड भोईर  (अपोलो जिम कळवा )
३) कैलास त्रिंबक कुतुबळे ( कै.बळीराम रामा मोकाशी. व्या विरावा )
४) संतोष लक्ष्मण पाटील (अपोलो जिम कळवा  )
5) शायन शौकत कसकर ( युनिव्हर्सल फिजीक्स से . भिवंडी )
६) लुकमान य्यासुद्दिन शैख  ( युनिव्हर्सल फिजीक्स से . भिवंडी )
७) हरेश एकनाथ नाईक ( आर. एन. फिटनेस वर्ड, कल्याण )

गट तिसरा
१)अक्षय श्रवण कारभारी (अपोलो जिम, खारेगाव)
२) प्रेम श्यामराव शिंदे  (जय भारत स्पोर्टस क्लब, खारेगाव)
३) रविराज सुदाम सावंत ( युनिव्हर्सल फि सेंटर . भिवंडी )
४) कुणाल सुदाम घरत (अपोलो जिम कळवा  )
५) रोशन सुरेंद्र खराडे ( द बॉडी फीट जिम कळवा)
६) सुर्यकांत विश्वासराव जाधव (मेट्रोफेक्स जिम, डोंबिवली)
७) आनंद महादेव पाटील (अपोलो जिम, खारेगाव)

गट चौथा
१) राहुल नामदेव जाधव ( युनिव्हर्सल फिटनेस सेंटर . भिवंडी )
२)वैभव सुरेश कळमकर (अपोलो जिम, खारेगाव)
३)विजय हरी गोग्स  (श्री स्वामी समर्थ जिम ठाणे)
४)सुनील त्र्यंबक खरात (अपोलो जिम, खारेगाव)
५) प्रविण गणेश चौधरी (अपोलो जिम, खारेगाव)
६)प्रसाद सुधाकर शेट्टी  (बॉडी फ्युयल शहापूर )
७) बंटी अर्जुनसिंग लबाना (समर्थ व्यायाम मंदिर, डोंबिवली )

     या स्पर्धेसाठी ज्युरी मेंबर म्हणून पी.एन.नाईक,हेमचंद्र ओवळेकर तर प्रमुख पंच म्हणून मोहन करंदेकर,अशोक मोकाशी,नंदकुमार तावडे,भरत पाटील,रवींद्र कासारे,रामचंद्र भोईर,सुरेंद्र महाडिक,प्रसाद पवार, संतोष मलबारी, माधव भोळे गुणलेखक भगवान सावंत, सुधीर कुमठेकर यांनी काम पहिले.

Web Title: Akshay Karbhari's 'Mayor Shree' Kitab Honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.