एकटेपणाला कंटाळून पळालेला अक्षय स्वगृही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 01:29 AM2020-01-22T01:29:00+5:302020-01-22T01:45:51+5:30

पोटचा पोर परत मिळाल्याने त्या माता-पित्याने सोमवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानक गाठून आरपीएफचे आभार मानले.

Akshay rutern home, who is leave home due to lonely ness | एकटेपणाला कंटाळून पळालेला अक्षय स्वगृही

एकटेपणाला कंटाळून पळालेला अक्षय स्वगृही

Next

ठाणे : आईवडील दोघेही कामाला जातात. त्यामुळे शाळेतून आल्यावर एकट्याला रिकामे असलेले घर खाते. त्या दोघांपैकी दुपारी कोणीच घरात नसल्याने घर नकोसे झाल्याने भांडूपमधील अकरा वर्षीय अक्षय याने (नाव बदलेले आहे) घरातून पलायन केल्याची धक्कादायक बाब समोर आली. ठाणे रेल्वेस्थानक ात रविवारी तो घुटमळताना आढळल्याने ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी विचारपूस करून त्यास रात्रीच पालकांच्या स्वाधीन केले. पोटचा पोर परत मिळाल्याने त्या माता-पित्याने सोमवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानक गाठून आरपीएफचे आभार मानले.

रविवारी ठाणे आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक नवीन सिंह, पोलीस कॉन्स्टेबल भास्कर सावंत आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक विजय ठोकले हे रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. याचवेळी त्यांना एक लहान मुलगा बराच वेळ एकाच ठिकाणी एकटा घुटमळताना दिसून आला. त्यामुळे आरपीएफ जवानांनी त्याचा विश्वास संपादन करून विचारणा केली. त्यावेळी, त्याने तो भांडूप येथे राहणारा असून त्याची आई त्याला ठाणे रेल्वेस्थानकात सोडून गेल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या त्या बोलण्यावर संशय आल्याने त्याला तातडीने ठाणे आरपीएफ ठाण्यात आणले. त्यावेळी त्याने जो पत्ता सांगितला. त्याच परिसरात महाराष्टÑ सुरक्षा बल सुरक्षारक्षक ठोकल हे भांडूप येथे राहणारे असल्याने त्यांना त्या परिसराची बऱ्यापैकी माहिती होती. त्यानुसार त्यांच्यामार्फत त्या परिसरात अक्षयबाबत चौकशी केल्यावर त्याच्या पालकांची ओळख पुढे आली. त्यांना याबाबत माहिती देऊन त्याला रात्रीच त्यांच्या स्वाधीन केले. नंतर सोमवारी सकाळी पालकांनी ठाणे आरपीएफ पोलीस ठाणे गाठून पोलिसांचे आभार मानले.

आईवडील कामावर जात असल्याने घरात थांबणे झाले होते नकोसे
ठाणे आरपीएफ पोलिसांना अक्षय याच्याकडे १ हजार ५०० रुपये आणि एका मॉलमध्ये चॉकलेट खरेदीचे बिल मिळाले. तसेच बोलताना त्याने आईवडिल हे दोघेही कामाला जातात. त्यामुळे घरात बराच वेळ एकटा असतो.
घरात कोणी नसल्याने घर सोडण्याचा विचार केला. त्यानुसार रविवारी घरातील पैसे घेऊन निघालो. सुरुवातीला एका मॉलमध्ये जाऊन तेथे चॉकलेट खरेदी केले. घरात कोणी नसल्याने घर सोडण्याचा विचार केला.
त्यातील काही पैसे मित्राकडे ठेवले. कुठे जायचे हे माहित नव्हते. तरीही हिम्मत करून लोकलमध्ये बसून ठाणे रेल्वेस्थानकात आलो. येथे खरेदी केलेले चॉकलेट संपवले, असे त्याने सांगितल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली.

Web Title: Akshay rutern home, who is leave home due to lonely ness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.