अक्षयतृतीयेच्या सोनेखरेदीला बसला लॉकडाउनचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:04 AM2020-04-27T02:04:38+5:302020-04-27T02:04:47+5:30

ज्यांना लॉकडाउननंतर सोने दिले तरी चालणार आहे, अशांचेच बुकिंग सराफांनी घेतले. त्याचे प्रमाणही अत्यल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

Akshay Tritiya's gold purchase was hit by a lockdown | अक्षयतृतीयेच्या सोनेखरेदीला बसला लॉकडाउनचा फटका

अक्षयतृतीयेच्या सोनेखरेदीला बसला लॉकडाउनचा फटका

Next

ठाणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेच्या दिवशी होणाºया सोने खरेदीला लॉकडाउनचा मोठा फटका बसल्याची खंत सराफांनी व्यक्त केली. शुभमुहूर्त म्हणून आजच घरी सोने देण्याचा आग्रह करणाºया ग्राहकांकडून सराफांनी बुकिंग घ्यायला नकार दिला. त्यामुळे काही ठरावीक लोकांकडून आॅनलाइन बुकिंगसाठी विचारणा होत असली तरी लॉकडाउनमुळे घरपोच सोने द्यायचे कसे, हा पेच सराफांसमोर होता. ज्यांना लॉकडाउननंतर सोने दिले तरी चालणार आहे, अशांचेच बुकिंग सराफांनी घेतले. त्याचे प्रमाणही अत्यल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दसरा, धनत्रयोदशी या शुभमुहूर्तांवर वाहनखरेदी, एखादी नवीन वस्तू किंवा घरासारखी मोठी खरेदी केली जाते. या दिवशी सोनेखरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. ग्राहकांसाठी ज्वेलर्सकडे आकर्षक डिझाइन्स आणल्या जातात. परंतु यंदा लॉकडाउनमुळे सोनेखरेदीसाठी गुढीपाडव्याबरोबर अक्षयतृतीयेचाही मुहूर्त हुकला. दोन्ही मुहूर्त हुकल्यामुळे सराफांना फटका बसला. लॉकडाउनमुळे उच्चभ्रू लोकांकडूनच सोन्याची खरेदी करण्यात आली आहे. कारण मध्यमवर्गीयांकडे पैसा राहिलेला नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे आणि शुभमुहूर्त म्हणून सोने घ्यायचेच आहे, अशांनीच खरेदी केलेली आहे, असे ठाणे शहर ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश श्रीश्रीमल यांनी सांगितले. आॅनलाइन बुकिंगसाठी काही ग्राहकांनी संपर्क साधला. पण, त्यांना ताबडतोब डिलिव्हरी हवी असल्याने व्यापाऱ्यांनी नकार दिला.
>लॉकडाउनमुळे बाहेर पडणे शक्य नसल्याने त्यांना आम्ही नकार दिला. परंतु, ज्यांना लॉकडाउननंतर डिलिव्हरी दिलेली चालणार आहे, अशांचेच बुकिंग केले आणि त्यांच्याकडूनही आॅनलाइन संपूर्ण पैसे घेण्यात आले, असे सराफा कमलेश जैन यांनी सांगितले. ज्या लोकांनी आॅनलाइन सोने बुकिंग केले आहे, त्यांनी सोन्याचे नाणे खरेदीला प्राधान्य दिले आहे. तसेच, ज्यांनी बुकिंग केले आहे, त्यांनी केवळ मुहूर्त साधला आहे.
>मी कोणत्याही ग्राहकांचे आॅनलाइन बुकिंग घेतले नाही. लॉकडाउनचा कालावधी अनिश्चित असल्याने आणि लोकांना घरपोच सोने हवे असल्याने त्यांना ते देणे शक्य नव्हते. त्यामुळे दरवर्षी जितकी सोनेखरेदी होते, त्याच्या पाच टक्केदेखील सोनेखरेदी झाली नाही.
- अशोक गंभीरराव, सोनेचांदीचे व्यापारी
>भविष्यात दर वाढतील म्हणून ग्राहकांचे आॅनलाइन बुकिंगसाठी फोन येत आहेत. परंतु पुढे माल उपलब्ध होईल की नाही, ग्राहकांना सोने घरापर्यंत द्यायचे कसे, तसेच लॉकडाउन संपेपर्यंत ग्राहकांची थांबण्याची तयारी नाही आणि ज्यांची लगेच पैसे द्यायची तयारी आहे, त्यांना सोनेही लगेच हवे आहे, असे सगळे प्रश्न असल्याने बुकिंग घेण्यात आलेले नाही. - तेजस सावंत,
सोनेचांदीचे व्यापारी
>मी वयाच्या २१ व्या वर्षापासून व्यवसायात उतरलो. प्रत्येक वर्षी अक्षयतृतीयेला कमीतकमी १0 ग्रॅम तरी सोनेखरेदी करायचो. पण लॉकडाउनमुळे मी थेट सोनाराच्या दुकानात जाऊन खरेदी करू शकत नसलो तरी, शुभमुहूर्तावर आॅनलाइन सोने बुकिंग केले आहे. ते सोने लॉकडाउननंतरच घेऊन येईल.
- किरण पाटील, ग्राहक
>लॉकडाउनमुळे क वर्गातील सराफांचे हाल झाले आहेत. ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे त्यांना करात सूट द्यावी, अशी मागणी ठाणे शहर ज्वेलर्स असोसिएशनने केली आहे.

Web Title: Akshay Tritiya's gold purchase was hit by a lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.