ठाणे जिल्ह्यातील मृतांच्या संख्येत चिंताजनक वाढ; ५२ मृतांसह ५,४४१ रूग्ण वाढले  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:03 PM2021-04-22T22:03:40+5:302021-04-22T22:04:01+5:30

ठाणे शहरातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज एक हजार ४५८ रूग्णांची त्यात भर पडल्यामुळे शहरातील रूग्ण संख्या आता एक लाख ११ हजार ६३२ झाली.

Alarming rise in death toll in Thane district; An increase of 5441 patients with 52 deaths | ठाणे जिल्ह्यातील मृतांच्या संख्येत चिंताजनक वाढ; ५२ मृतांसह ५,४४१ रूग्ण वाढले  

ठाणे जिल्ह्यातील मृतांच्या संख्येत चिंताजनक वाढ; ५२ मृतांसह ५,४४१ रूग्ण वाढले  

Next

ठाणे : जिल्ह्यातील रूग्ण संख्येत काही दिवसांच्या तुलने गुरुवारी वाढ झाली. दिवसभरात पाच हजार ४४१ रूग्णांची भर असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्ण संख्या चार लाख लाख ३६ हजार ९२ झाली असून मृतांची संख्या सात हजार १३० नोंदली आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

ठाणे शहरातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज एक हजार ४५८ रूग्णांची त्यात भर पडल्यामुळे शहरातील रूग्ण संख्या आता एक लाख ११ हजार ६३२ झाली. आज ११ मृत्यू झाल्याने आता मृत्यूची संख्या एक हजार ५८८ नोंदली आहे. कल्याण - डोंबिवलीलाही एक हजार ६७० रुग्णांची वाढ झाली असून नऊ मृत्यू आहे. या शहरात आता आता एक लाख ११ हजार ६०६ रुग्ण बाधीत झाले असून एक हजार ३५२ मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरमध्ये १८० रुग्ण सापडले असून एकही मृत्य नाही. येथील बाधितांची संख्या १७ हजार ८६९ झाली असून ४०२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला ८२ बाधीत असून तीन मृत्यू झाले आहे. नऊ हजार ४६६ बाधीत असून मृतांची संख्या ३८४ आहे. मीरा भाईंदरला ४७९ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या ३९ हजार ८९५ असून मृतांची संख्या ९५६ झाली.

अंबरनाथला २३६ रुग्ण आढळल्याने आता बाधीत १६ हजार १८० असून एकाचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ३५१ नाेंदली आहे. बदलापूरमध्ये २४९ रूग्ण आढळले असून चार मृत्यू आहे. त्यामुळे बाधीत १७ हजार १४७ नोंदले असून मृत्यूची संख्या १४९ आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २७८ रूग्णांची वाढ झाली असून पाच मृत्यू आहे. आता बाधीत २४ हजार २६३ असून मृत्यू ६४८ नोंदले गेले आहेत.
 

Web Title: Alarming rise in death toll in Thane district; An increase of 5441 patients with 52 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.