इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अलिषा त्रिपाठी प्रथम क्रमांक
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 15, 2023 04:32 PM2023-10-15T16:32:56+5:302023-10-15T16:33:10+5:30
के.जी.जोशी बेडेकर कॉलेजमधील अलिषा त्रिपाठी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिला २००० रुपये, फिरता चषक, चषक,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात पार पडलेल्या श्री .स.वि. कुलकर्णी आंतरमहाविद्यालयीन इंग्रजी वकृत्व स्पर्धेत ठाणे,मुंबई, नवीमुंबई, रायगड या जिल्ह्यांतील २७ महाविद्यालयातील ४६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत के.जी.जोशी बेडेकर कॉलेजमधील अलिषा त्रिपाठी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिला २००० रुपये, फिरता चषक, चषक,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच, डॉ.अशादुल्ल्हा खान इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, मुंब्रा या महाविद्यालयातील काझी सिद्राह इरफान हिने दुसऱ्या आणि एन.एम.कॉलेज विलेपार्ले, मुंबई या महाविद्यालयातील प्रणव राजू याने तृतीय पारितोषिक पटकावले. दुसऱ्या पारितोषिकपात्र विजेत्या स्पर्धकास १५०० रुपये ,चषक व प्रमाणपत्र तर तिसऱ्या पारितोषिकपात्र विजेत्या स्पर्धकास १०००रुपये,चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या व्यतिरिक्त इतर ५ उत्तेजनार्थ पारितोषिके विद्यार्थ्यांना देण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्राचार्य डॉ.गणेश भगुरे, उपप्राचार्य प्रा.सीताराम वाहुळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, पर्यवेक्षक प्रा.राजेंद्र वेखंडे हे या प्रसंगी उपस्थित होते.
प्रल्हादराय दालमिया महाविद्यालय,मालाड येथील प्रा.अनिल बागडे आणि संदेश महाविद्यालय, विक्रोळी येथील प्रा. अभिमान पाटील यांनी परीक्षक म्हणून काम केले. स्पर्धाप्रमुख प्रा. उत्तरा जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर प्रा.संगीता बावीस्कर इंग्रजी विभाग प्रमुख यांनी परिक्षकांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. क्रिस्तिन मेंडोसा यांनी केले. प्रा.प्रल्हाद सोनावणे यांनी आभार प्रदर्शन केले.